Neera Bazar Samiti : अजितदादांकडून निष्ठावंतास न्याय : नीरा बाजार समिती सभापतीपदी जगताप बिनविरोध; उपसभापतीवरून घोळ

उपसभापतीपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादीचा ताळमेळ बिघडल्याने पद तूर्तास रिक्त राहिले.
Neera Bazaar Samiti Sabhapati Election
Neera Bazaar Samiti Sabhapati ElectionSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले. राष्ट्रवादेच पुरंदर तालुक्याच्या माहूर या दुर्गम भागातील शरद नारायण जगताप यांची सभापतीपदी निवड करून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निष्ठावंतास न्याय दिला आहे. मात्र उपसभापतीपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादीचा ताळमेळ बिघडल्याने पद तूर्तास रिक्त राहिले. पुढील बैठकीत ही निवड केली जाणार आहे. (NCP's Sharad Jagtap unopposed as Chairman of Neera Bazaar Samiti)

पुरंदर (Purandar) तालुक्यातील शंभर व बारामती तालुक्यातील बत्तीस गावांचा समावेश असलेल्या नीरा (Neera) बाजार समितीत (Bazar Samiti) राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने सर्व अठरा जागांवर निर्विवाद विजय मिळविला होता. भाजप व शिंदे सेनेच्या उमेदवारांचा सुफडा साफ केला होता. राष्ट्रवादीचे पुरंदरमधून पाच व बारामतीतून पाच असे दहा, तर काँग्रेसचे पुरंदरमधून आठ संचालक आहेत. पहिले सभापतीपद पुरंदरलाच मिळणार हे निश्चित होते. मात्र, काँग्रेसच्या की राष्ट्रवादीच्या वाट्याला येते, याचीच कार्यक्षेत्रात उत्सुकता होती.

Neera Bazaar Samiti Sabhapati Election
Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपद नको रे बाबा...! : पराभवाच्या भीतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांचा हायकमांडला नकार

आज सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नीरा बाजार समितीच्या सासवड कार्यालयात निवडप्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षश्रेष्ठींच्या निरोपानुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद नारायण जगताप यांचा एकमेव अर्ज सभापतीपदासाठी दाखल झाला आणि त्यांची निर्धारित वेळेनंतर बिनविरोध निवड जाहीर झाली.

मागील पंचवार्षिक कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. त्यावेळी पहिले सभापतीपद नंदकुमार जगताप यांच्या रूपाने काँग्रेसला मिळाले होते. यावेळी भाकरी फिरविल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादेच संचालक अधिक असणे व ग्रामपंचायत मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत बारामतीच्या एकगठ्ठा मतांनी विजय मिळाल्याने निर्णय झाला असावा.

Neera Bazaar Samiti Sabhapati Election
Sameer Wankhede News : ‘भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा का? : दाल में कुछ काला है...’

दरम्यान, अखेरपर्यंत उपसभापतीपदी कोण हा पेच सुटू शकला नाही. याबाबत नेमकी माशी कुठे शिंकली हे कळायला वाव नाही. परंतु बारामती तालुक्याला उपसभापतीपद द्यायचे यावरून चर्चा झाली. मात्र बारामती तालुक्यात फक्त राष्ट्रवादीचेच पाच संचालक आहेत.

सभापती राष्ट्रवादीचा झाल्याने उपसभापती काँग्रेसचा होणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसला बारामतीत प्रतिनिधीत्वच नव्हते. पुरंदरमध्ये त्यांचे आठ संचालक आहेत. त्यापैकी एका नावावर एकमत का झाले नाही? की काँग्रेसला उपसभापतीपद मान्य नाही? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Neera Bazaar Samiti Sabhapati Election
Karjat Bazar Samiti : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी : कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे गटाला ९ जागा कायम

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांनी, सर्वसहमतीने सभापती निवड झाली, तशीच आता उपसभापती निवडही सर्वसहमतीने येत्या बैठकीत होईल, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे म्हणाले की, उच्चशिक्षित, होतकरू व्यक्तीस सर्वांनी मिळून सभापतीपदाची संधी दिली आहे. त्यांच्याकडून उत्कृष्ट कामकाज होईल. आताच्या निवडीत काँग्रेसकडे उपसभापतीपद आहे.

Neera Bazaar Samiti Sabhapati Election
Vasantrao Kale Sugar Factory Election: कल्याणराव काळेंना पहिला धक्का; दीपक पवार, बी. पी. रोंगे यांचे अर्ज मंजूर

दुर्गम भागास न्याय

शरद जगताप यांच्या रूपाने वीर-परिंचे-माहूर पट्ट्यात पहिल्यांदाच सभापतीपद पोचले आहे. जगताप हे माहूर सोसायटीचे अनेक वर्ष अध्यक्ष आहेत. शिवाय सलग तीनदा ग्रामपंचायत सदस्यही आहेत. त्यांचे वडीलही गावचे सरपंच होते. त्यांच्या पत्नी मानसी जगताप या सोमेश्वर कारखान्याच्या संचालक होत्या तसेच तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षही होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com