NCP Rajya Sabha candidate : मोठी बातमी! राज्यसभा उमेदवार निवडताना सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र, प्रफुल पटेलही खूश! 'या' नेत्याचे नाव केले घोषित

NCP Rajya Sabha candidate News : रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्यात आला.
Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Praful Patel, Ajit Pawar, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार ठरला आहे. रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्यात आला. या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेल्या दोन दिवसापासून वेगवान घडामोडी घडत होत्या. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून बैठका होतआहेत. रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी कोअर कमिटीच्या बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सम्रीर भुजबळ यांच्यासह बैठकीला दिग्गज नेतेमंडळी हजर होते.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Rajya sabha Election : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचे नाव फायनल : पण, CM फडणवीसांना घ्यावी लागणार दिल्लीची परवानगी

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरा राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्याला आला. या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या राज्यसभेच्या जागेवर उमेदवारीबाबत दोन दिवसापासून बैठका होत होत्या. या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव आघाडीवर होते. राज्यसभेवर जाण्यास भुजबळ तयारही आहेत. त्यासाठी मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एक अट घातली होती. भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी अशी अट ठेवली होती.

त्यानंतर शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी या नेतेमंडळींनी फडणवीसांकडे तसा आग्रह धरला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय असल्याने दिल्लीतील हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले होते.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, राज्यसभा उमेदवारीबाबत सस्पेन्स संपणार; कोअर कमिटीच्या बैठकीत भुजबळांसह 'ही' चार नावे चर्चेत

दरम्यान, दुसरीकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा देखील इच्छुक होत्या. गेल्या चार दिवसापासून त्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. रविवारी सकाळी त्यांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक, समीर भुजबळ, राजेंद्र जैन व अमरसिंह पंडित यांची नाव चर्चेत होती. या नावावर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
NCP Rajya Sabha Candidate : 'राष्ट्रवादी'कडून राज्यसभा उमेदवारी नवनीत राणांना? दुसऱ्यांदा घेतली सुनेत्रा पवारांची भेट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com