Ajit Pawar alliance : संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’! ‘पवार फॅमिली रीयुनियन’चा इशारा? अजितदादा लवकर आघाडीत दिसतील

Sharad Pawar Family May Reunite; Ajit Pawar Likely to Join Alliance, Claims Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच पुन्हा दावा केल्यानं, राज्यात चर्चांना तोंड फुटलं आहे.
Ajit Pawar alliance
Ajit Pawar allianceSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या एका दाव्याने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघू लागलं आहे.

'शरद पवार आणि अजित पवार हे लवकरच एकत्र येतील, ते सध्या एका चिन्हावर लढत आहेत, अन् अजितदादा हे आघाडीत असतील, असा आम्हाला विश्वास आहे,' असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे पक्ष पुण्यात एकत्र आले. पण होमग्राऊंडवर पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांना समोरे जाताना दोन्ही पवारांचे पक्षांची बहुतांशी ठिकाणी झाल्याचे दिसते. यामुळे आगामी काळात दोन्ही पवार पक्ष एकमेकांमध्ये विलीन होणार, अशी चर्चा आहे. यातच शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही पवार राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याचा दावा करताना, अजितदादा लवकरच आघाडीत दिसतील, असे विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र होताना दिसत असल्याचे सांगताना शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांच्यासह अजित पवार हे लवकरच महाविकास आघाडीत असतील, असा आमचा विचार आहे. अजित पवार महायुतीत आहेत. पण शरद पवार यांच्याबरोबर ते दिसत आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. पण अजित पवार यांनी महाविकास आघाडीबरोबर पाट लावला दिसतो आहे."

Ajit Pawar alliance
Mumbra Hara Bana Denge : अगोदर 'कैसा हराया', 'मुंब्रा हरा बना देंगे'; पोलिसांची नोटीस अन् 'AIMIM'च्या सहर शेख यांचा माफीनामा!

शरद पवार अन् अजित पवार यांच्या एकत्र येण्यात बऱ्याच घडामोडी दिसत असल्याचे भाष्य करताना, "अजित पवार यांना काहीतरी सोडावे लागेल आणि काहीतरी स्वीकारावे लागेल, याचा निर्णय अजितदादा यांना घ्यावा लागेल, ते दोन दगडांवर पाय ठेवू शकत नाहीत," असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar alliance
ZP Election : आमचं वय संपणार आहे...पुढे कधी संधी मिळणार?; इच्छुकांच्या आक्रमक प्रश्नांनी नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली

अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याच आणि छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा दाखल देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कितीही गर्जना केली, तरी अजित पवार अन् छगन भुजबळ यांचे काहीही होत नाही. मेलेल्या मेंढराला आगीची भीती नसते. छगन भुजबळ यांना न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे. आता राज्याच्या गृहखात्यापासून ते ईडीपर्यंत सर्वांनी प्रायश्चित केलं पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com