Pune News : शिवसेना ठाकरे गटाच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केले होते. संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील 25 जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असल्यास सांगितलं, तर सुषमा अंधारे यांनी पुण्यातील तीन जागांवर आपला दावा सांगितला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावर कडाडले आहेत.
पुण्यात आज शिवसेना (Shiv Sena) ठाकरे शिव संपर्क मेळावा पार पडला. यामध्ये ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जागा वाटपाबाबत अवश्य करत.आता कोणाच्याही प्रेमापोटी जागा वाटपामध्ये आपल्या हक्काच्या जागा गमावू नये, असं आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केलं. तसेच पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी आणि कोथरूड या तीन जागांवर दावा केला आहे. यानंतर बोलायला संजय राऊत यांनी देखील जागा वाटपावरती भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना जागा वाटपाबाबत कॉम्प्रमाईज करणार नाही, असा संकेत दिला.
संजय राऊत म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेची आहे. या प्रत्येक जागेवर यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा लढण्याची तयारी शिवसेना ठाकरे पक्षाची आहे". तसंच महाराष्ट्रामध्ये 288 जागा शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढवल्यास 160 जागांवरती आपला विजय होईल, असा दावा देखील त्यांनी केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कडाडले आहेत. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या राज्य आणि केंद्र पातळीवरच्या तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये तिन्ही पक्षांनी आपापले दावे केले आहेत. मात्र अद्याप तरी कोणताही फाॅर्म्युला निश्चित झालेला नाही. जागा वाटपाबाबत सर्वच निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होणार आहेत".
शिवसेना मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत वक्तव्य केली, असतील. मात्र याबाबत सर्वस्वी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतील. मात्र 2019 मध्ये ज्या जागा ज्या पक्षाने जिंकल्या होत्या, त्यांच्याकडेच राहतील, असा प्राथमिकरित्या निश्चित करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या जागा आमच्याकडेच राहतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाला देखील पुण्यामध्ये जागा सुटेल. मात्र यासाठी 2014 आणि 2019 मधील निकालाचा आढावा घेण्यात येईल. असं असलं, तरी खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती या जागा काल आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच राहतील, असा ठाम विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्या 288 जागा स्वबळावर लढण्याच्या दाव्यावर बोलताना जगताप यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना ताकद दाखवण्यासाठी राऊत यांनी, असं वक्तव्य केलं असेल. मात्र आम्ही देखील 288 जागा लढण्याची ताकद ठेवतो. मात्र शरद पवार यांच्या निर्णयानुसार आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले. शरद पवार यांनी महाविकास आघाडीची माळ गुंफली आहे. दुसरं तिसऱ्या फळीतील नेत्यांनी बाष्कळ वक्तव्य केली. तरी महाविकास आघाडीला छेद जाणार नाही, असे जगताप यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.