Sharad Pawar NCP: तब्येतीच्या कारणाहून राजीनामा घेतलेल्या रेखा खेडकर म्हणतात 'मी ठणठणीत...'; राजीनाम्यामागे कोण?

Rekha Khedekar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात अनेक ठिकाणी खांदेपालट सुरु केली आहे. बुलढाण्यात पदाधिकारी नियुक्तीत फेरबदल करण्यात आले आहे.
Rekha Khedekar Resigns
Rekha Khedekar ResignsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: काही दिवसातच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे कोण आहे, असा प्रश्न सध्या बुलढाण्यात विचारला जात आहे. पक्षाकडून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची अंतर्गत कुजबूज सुरु आहे.

तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात असले तरी खुद्द रेखाताईंनी आपण ठणठणीत आहोत, असे सांगितल्यानंतर या राजीनामा नाट्यामागे कोण आहे, याबाबत संशयाची सुई पक्षातील कोणत्या वरिष्ठ नेत्यांकडे जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काहीही कारण नसतांना त्यांनी राजीनामा का दिला? याची चर्चा विदर्भात होत आहे. त्या कुठल्या पक्षात जाणार याबाबत तर्कविर्तक केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षात अनेक ठिकाणी खांदेपालट सुरु केली आहे. बुलढाण्यात पदाधिकारी नियुक्तीत फेरबदल करण्यात आले आहे.

तब्येतीचे कारणाहून रेखा खेडेकर यांनी राजीनामा दिल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले असले तरी रेखा खेडेकर यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. आपण ठणठणीत असल्याचे खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षबांधणीसाठी प्रदेशस्तरावर बदलप्रक्रियेला अनुसरून त्यांनी राजीनामा दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

Rekha Khedekar Resigns
Sudha Murthy: आम्ही मागासवर्गीय नाहीत, सुधा मूर्तींनी अधिकाऱ्याला खडसावले; जातीय जनगणनेत सहभागी होण्यास नकार

खेडेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर आता कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा सुरु आहे. यात नरेश शेळके यांचे नाव आघाडीवर आहे. मागील दोन वर्षांपासून नरेश शेळके यांचे नाव जिल्हाध्यक्ष म्हणून आघाडीवर होते.पण अचानक त्यांचे नाव मागे पडले. रेखा खेडेकर या जिल्हाध्यक्षा झाल्या. शेळके यांना कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पदावर ते नाराज असल्याचे बोलले जात होते.

शेळके हे सध्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात उत्तम काम करीत आहे. आहेत. शरद पवार यांना आयुष्यभर साथ देणार्‍यांचा सत्कार करीत शेळके यांनी ‘शिलेदार निष्ठेचे’ हा पुरस्कार सोहळा यशस्वीपणे करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे पक्षाकडून कौतुक करण्यात आले. राज्यभर ‘शिलेदार निष्ठेचे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com