Nilesh Lanke : कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सगळं कार्यकर्ते देतात, मग निलेश लंके खासदारकीच्या 'पगाराचं' काय करतात?

Nilesh Lanke Shares Political Journey Sarkarnama Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटल विशेष मुलाखत दिली.
Nilesh Lanke
Nilesh Lankesarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar politics : आपल्या देशात लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ज्यांना महिन्याला लाख रूपयांच्या वर मानधन आणि विविध भत्त्यांसह पेंशन देखील मिळते. दरम्यान केंद्र सरकारने दोन वर्षांच्या आधी खासदारांच्या पगाराबरोबरच भत्ते आणि पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचे वेतन एक लाख रूपयांनी वाढून ते 1.24 लाख रुपये प्रति महिना झाले आहे. तर दैनिक भत्ता हा 2000 वरून 2500 रूपये करण्यात आला आहे. तर पेंशनमध्ये देखील वाढ करण्यात आली असून 31000 प्रति महिना करण्यात आली आहे.

यामुळे खासदार एकदा झालं की विषयचं संपला असे म्हटलं जात आहे. अशातच मिळणारा पगार आपण घेतच नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. यामुळे सध्या त्यांच्या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लंके यांनी हा दावा सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटल विशेष मुलाखतीत केला आहे.

लंके यांनी आपल्याला मिळणारा खासदारकीचा पगार किंवा मानधन मी घेतच नाही, असे आपल्या मुलाखतीत म्हटलं होते. त्यांना खासदारांना सध्या लाखभर रूपये पगार मिळत असताना तो जातो कुठे असा सवाल करण्यात आला होता. यावर लंकेंनी उत्तर देताना ही रक्कम मी घेतच नाही.

Nilesh Lanke
Nilesh Lanke : ...म्हणून निलेश लंकेंनी अजितदादांच्या आमदारकीवर पाणी सोडत शरद पवारांची राष्ट्रवादी जवळ केली

ही रक्कम आमची एक संस्था जे प्रतिष्ठान आहे त्याला वर्ग केली जाते. येथे जमा होणारी रक्कम माझ्या पगारासह अनाथ असणाऱ्या मुलांसाठी वापरली जाते. ज्या मुलांना आई-वडीलच नाहीत. जे निराधार आहेत किंवा ज्या आई-वडील आहेत पण ते त्यांना शिकवण्यास असमर्थ आहेत अशांच्या शिक्षणासाठी खर्च आमचे प्रतिष्ठाण करते. आमचे प्रतिष्ठ कोणतेही मर्यादा न आखता शिक्षण आणि आरोग्याच्या समस्येवर काम करते.

आम्ही फक्त आमचा मतदार संघ असा विचार न करता नांदेड असो की सिंधुदुर्ग त्यांच्या समस्येप्रमाणे त्याला मदत करतो. मग तो दुसऱ्या राज्यातला अशला तरिही मदत केली जाते. प्रतिष्ठान फक्त अनाथ निराधारांनाचमदत करते असे नाही तर अपंगाना देखील जास्तीत जास्त मदत करण्याचे काम करते. त्यामुळे खासदारकीची रक्कम घेत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Nilesh Lanke
Nilesh Lanke Interview : सुजय विखेंना मी कधीच समोरासमोर भेटलो नाही, लंकेंनी सगळच सांगितलं

तर आपल्याला समाजातील गोर गरीब लोकांच्या झोपडीत जावून त्यांचे अश्रू पूसण्याची आवड असून हे कार्य घरातील लोकांनीही वाहून घेतलं आहे. यामुळे आवडीमुळे घरातील कोण कुठे फिरायला जाणेही विचारात घेत नाही. आपली कोणतीच आवड धरून न ठेवता लोकांची मदत करणं हेच माझ्यासह घरातल्यांना महत्वाचे आहे. तर पाचीपक्वान महत्वाचे नसून भाकर महत्वाचे आहे. यामुळे हॉटेलमध्ये जाण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे नीलेश लंके यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com