Suraj Chavan : 'छावा'च्या प्रदेशाध्यांना मारहाणीचे सूरज चव्हाणांनी दुसरेच कारण सांगितले; म्हणाले, 'सुसंस्कृत नेत्याचा वारसा...'

Chhava Sanghatana Leader Assaulted  Suraj Chavan : अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली.
Suraj Chavan
Suraj Chavan sarkarnama
Published on
Updated on

Suraj Chavan News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यासमोर ‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील यांनी पत्ते टाकले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्यांना बेदम मारहाण केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील विजयकुमार यांच्यावर तुटून पडले होते. या प्रकरणाचा निषेध स्वतः सुनील तटकरे यांनी केला होता. मात्र, सूरज चव्हाण यांची या प्रकरणावर काल काही प्रतिक्रिया आली नव्हती.

सूरज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठत असताना त्यांनी आज ट्विट करत आपली बाजू मांडली आहे.  'छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला.', असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

'महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता.', असे देखील सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Suraj Chavan
Gujarati language in Mumbai : गुजरात भाजप आमदारानं मुंबईत येत 'मनसे'ला डिवचलं; संपर्क कार्यालयाच्या 'गुजराती भाषे'वर ठाम

'आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.', असे म्हणत चव्हाण यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे.

Suraj Chavan
Nashik politics: विधिमंडळात नाशिकची फौज; चार मंत्री अन् १० आमदार! पदरात काय पडले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com