

Nilesh Rane News : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात तीन जागांवर महायुतीचा झालेला पराभवाला एकनाथ शिंदेंची शिवेसना जबाबदार असल्याचे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून याचे प्रत्युत्तर देण्यात आले. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यानंतर आमदार निलेश राणेंनी थेट बन यांची लायकी आहे का? असे म्हणत टीका केली.
राणे यांनी आपल्या ट्विटवर अवघ्या दोन ओळींचे ट्विट करत थेट नवनाथ बन यांना इशारा दिला. ते म्हणाले, 'नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती.'
रवींद्र धंगेकर यांनी देखील बन यांच्यावर टीका करताना म्हटले की, तो मागच्या दाराने भाजपमध्ये आला आहे. त्याला केवळ तोंडवाजवता येते. त्याची प्रतिमा माणसांमध्ये चांगली नाही. तो पगारी पत्रकार आणि भाजपचा सदस्य आहे पण तो काय बोलतो याला काही अर्थ नाही. त्याल समजत असेल तरच त्याने बोलावे.'
पदवीधरमधील पराभवानंतर नवनाथ बन यांनी ट्विट करत म्हटले की, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.