Raj Thackeray Vs Nishikant Dubey : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निशिकांत दुबेंने पुन्हा डिवचले, म्हणाले, 'हिंदी सिखा...'

Hindi Imposition marathi Raj Thackeray Nishikant Dubey : मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या जाहीर सभेतमध्ये परप्रांतातून महाराष्ट्रात येऊन माज दाखवायचा नाही, असा इशारा दिला आहे.
Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Raj Thackeray Vs Nishikant Dubey sarkarnama
Published on
Updated on

Nishikant Dubey News : 'महाराष्ट्र के बाहार आना बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आना तुम्हे पटक पटके मारेंगे' असे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाला होता. त्याला राज ठाकरेंनी आपल्या मीरा-भाईंदरच्या जाहीर सभेतून हिंदीतूनच उत्तर दिले.

राज ठाकरे म्हणाले, 'दुबे तुम मुंबई में आ जावो...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे...'. या इशाऱ्यानंतर ट्विट करत निशिकांत दुबे याने राज यांना आपण हिंदी शिकवल्याचे म्हटले आहे.

निशिकांत दुबे याने 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?' असे ट्विट केले आहे. त्याने ट्विट करताना राज ठाकरे जाहीर सभेतून त्याला उत्तर देत असलेल्या व्हिडिओ देखील रिट्विट केला आहे. राज ठाकरेंना हिंदी शिकवली असे म्हणत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या जाहीर सभेतमध्ये परप्रांतातून महाराष्ट्रात येऊन माज दाखवायचा नाही. हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारची सत्ता विधानसभेत आणि लोकसभेत आहे. मात्र, आमची सत्ता रस्त्यावर आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Uddhav Thackeray: दाढीवरुन हात फिरवणाऱ्यांची लोक बिन पाण्याची करतील; ठाकरे ब्रॅण्ड संपवण्याची प्रयत्न करणारे बाहेर बँण्ड वाजवीत फिरताहेत!

देवेंद्र फडणवीसांना इशारा

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले म्हणे की आम्ही तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. जर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताना तिसरी भाषा सक्तीची आम्ही आणणार म्हणजे आणणार. मी आत्ता सांगतोय तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून बघा दुकानंच नाही शाळाही बंद करीन.', असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Sharad Pawar Crisis : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप, हर्षवर्धन पाटलांसह दौंडमधला मोठा नेता शरद पवारांची साथ सोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com