BJP-MNS Alliance : एका पत्रकाराने बातमी फोडली... नाहीतर 12 वर्षांपूर्वीच 'भाजप-मनसे' युती झाली असती

BJP-MNS Alliance : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने खळबळ उडाली आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये या नेत्यांची भेट झाली.
Nitin Gadkari, Raj Thackeray
Nitin Gadkari, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BJP-MNS Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने खळबळ उडाली आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये या नेत्यांची भेट झाली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि भाजप युतीबाबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी भाजप-मनसे युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. पण त्यावेळी अधिकृत युती होऊ शकली नव्हती. राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना केवळ बाहेरून पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेने तटस्थ राहुन निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र अधिकृत युतीबाबत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाल्याची माहिती आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का, 12 वर्षांपूर्वी एक पत्रकाराने बातमी फोडली नसती तर तेव्हाच या दोन्हीही पक्षांची युती झाली असती.

राजदीप सरदेसाई यांनी आपल्या The Election That Changed India 2014 या पुस्तकात याबद्दल गोष्ट सांगितली आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे होती. 2009 मध्ये मनसेच्या उमेदवारांचा युतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी मनसेसोबत युती करावी असा विचार भाजपमध्ये सुरु होता. त्यावेळी युतीत भाजपसोबत शिवसेनाही होती. शिवसेनेचा मनसेला सोबत घेण्यास विरोध होता.

Nitin Gadkari, Raj Thackeray
Raj Thackeray News : 'मला भेटायला येऊ नका...', राज ठाकरेंनी आवाहन करताना सांगितलं खरं कारण

मग या अडचणीच्या मुद्द्यावर मार्ग काढण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावर सोपविण्यात आली. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या चर्चेसाठी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक गुप्त बैठक आयोजित करण्यात आली. राज ठाकरे यांनी सरदेसाई यांना सांगितल्याप्रमाणे, “ आम्ही दोघेही हॉटेलच्या एका लिफ्टमध्ये गेलो. पण तिथे एका पत्रकाराने आम्हाला पाहिले. त्यानंतर ही बैठक गुप्त राहिली नाही". माध्यमांमध्ये बातम्या आल्याने ही चर्चा पुढे गेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यावेळी युतीविरोधात उमेदवार उभे न करता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com