Nitin Gadkari News : छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केली होते. त्यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत होती.एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते, असे म्हटले आहे.
'आजकाल सेक्युलर हा खूप प्रचलित शब्द आहे. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीमध्ये अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांसोबत समान न्याय करणे हा अर्थ आहे. शिवाजी महाराज आपल्या इतिहासामधील असे राजा होते जे 100 टक्के सेक्युलर होते.', असे नितीन गडकरी म्हणाले.
'शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या पण कोणत्या मशिदीवर हल्ला त्यांनी केला नाही. ज्या अफझल खानाने त्यांच्यावर वार केला त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचावर वार केला. त्या अफजल खानाचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा असे आदेश दिले होते.', असे नितीन गडकरी म्हणाले.
'छत्रपती शिवाजी महाराज हे प्रशासनात कठोर होते. लोकांसाठी संवेदनशील राजा होते. महिलांविषयी त्यांना आदर होता. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांच्यासमोर आणली गेली तेव्हा त्यांनी तिला त्यांनी सन्मानाने घरी पाठवले.
महाराजांचं वैशिष्ट्य हेच होतं की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होते.' असेही नितीन गडकरी म्हणाले.
शिवाजी महाराजाच्याबाबत इंग्रजांनी जो इतिहास लिहिला त्यामध्ये अनेक चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी होत्या. लुटारी असा उल्लेख त्यांनी केला. पण शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.रयतेचं राज्य ही संकल्पना त्यांनी आणली होती. त्यांनी स्वराज मिळवलं आणि त्यामचे रुपांतर सुराज्यात केले. असे आदर्शवत काम त्यांनी केले, असे नितीन गडकरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.