Laxman Hake : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या निशाण्यावर फडणवीसांचा लाडका आमदार; म्हणाले, ...

OBC Protest News : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातील एका घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Laxman hake, abhimanyu Pawar
Laxman hake, abhimanyu Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Latur News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी लातूर जिल्ह्यातील एका घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी बीड जिल्ह्यातील मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले होते. त्यासोबाबतच यावेळी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कोपर्डीसारखे मोर्चे काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अभिमन्यू पवार यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेत बीड येथील मोर्चातील लोकभावना त्यांच्या कानावर घातली होती. त्यासोबतच या प्रकरणाचा फॉलोअप ते पत्रव्यवहार करून घेत आहेत.

Laxman hake, abhimanyu Pawar
Sudhir Mungantiwar Press Conference : ठाकरेंना बरोबर घ्यायचं का? भाजप आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्टचं सांगितलं

दुसरीकडे लातूर जिल्ह्यातल्या टाकळी गावात 18 वर्षीय तरुणाचा प्रेमप्रकरणावरून झालेल्या मारहाणीत खून झाला. या युवकाचा 6 जानेवारीला मृत्यू झाला. हा प्रकार ऑनर किलिंगचा वाटत आहे. त्या कुटुंबाची आमदार पवार यांनी भेट घ्यावयास हवी होती. मात्र, ते अद्याप त्या कुटुंबाच्या भेटीसाठी गेलेले नाहीत. त्यामुळे ते या कुटुंबाला कधी भेटणार? असा सवाल करीत लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिमन्यू पवारांवर (Abhimanyu Pawar) जोरदार निशाणा साधला. त्यासोबतच बीड येथील सरपंच कुटुंबाच्या भेटीसाठी जाणारे सर्वपक्षीय नेतेमंडळी या ठिकाणी का भेटीसाठी जात नाहीत ? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केला.

Laxman hake, abhimanyu Pawar
Sudhir Mungantiwar : खतपाणी घातल्याने कुठलाही नेता मोठा होत नाही; मुनगंटीवारांचा टोला कुणाला?

सामाजिक कार्यकर्त्यांना खालच्या जातीतील लोकांचा मृत्यू दिसतो का नाही ? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी उपस्थित केला. एकंदरीत लक्ष्मण हाके यांनी केलेल्या या टीकेला आमदार अभिमन्यू पवार आता कशा प्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Laxman hake, abhimanyu Pawar
Nitesh Rane : विशाळगडावर ऊरूस होऊ देणार नाही; मंत्री नीतेश राणेंच्या इशाऱ्यानं खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com