Video Amol Mitkari On Ramdas Kadam : "...म्हणून तुमची लंगोट वाचली," मिटकरींनी रामदास कदमांना सुनावलं

Ramdas Kadam On Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून रामदास कदमांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
ajit pawar ramdas kadam amol mitkari
ajit pawar ramdas kadam amol mitkarisarkarnama

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ऑर्गनायझर' मुखपत्रानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते, रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

'अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते, तर चालले असते,' असं विधान करून रामदास कदम यांनी एकप्रकारे लोकसभेतील अपयशाचं खापर अजित पवार यांच्यावर फोडलं

रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली," अशा शब्दांत मिटकरींनी कदमांचा समाचार घेतला आहे.

ट्वीट करत अमोल मिटकरी म्हणाले, " रामदास कदमजी आपण जोरात बोललात 'मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं.' माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असते. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका."

रामदास कदम काय म्हणाले होते?

"विधानसभा निवडणुकीत कुठेही गाफील राहता कामा नये, ही विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. वेळेवर भाजपचे उमेदवार दिले, तसे शिंदेंचे 15 उमेदवार दिले असते, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. भावना गवळी, हेमंत पाटील, हेमंत गोडसे दिल्लीला गेले असते. शिंदे गटानं उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपचे मंडळींनी जागेवर दावा करण्यास सुरूवात केली. हे थांबवण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही मला नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेऊन जावा. विधानसभेला 100 जागा घ्या, त्यातील 90 निवडून आणू. दोन अडीच वर्षांत मुख्यमंत्री शिंदेंनी क्रांतीकारी निर्णय घेतले. याबद्दल फडणवीस आणि अजत पवारांचं अभिनंदन आहे. अजितदादा थोडे दिवस आले नसते, तर चालले असते," असं रामदास कदमांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com