Laxman Hake News : हाकेंच्या घरची चूल चार दिवसांपासून पेटली नाही; मुलाच्या आठवणीने आई-वडिलांचे डोळे पाणावले

OBC Reservation : सांगोला तालुक्यातील लक्ष्मण हाके यांच्या जुजारपूर येथील घरी गेल्या चार दिवसापासून चूल पेटली नाही. मुलाच्या आठवणीने भावुक झालेल्या हाके यांचे आई वडिलांचे अश्रू अनावर झाले आहेत.
Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी आठवा दिवस आहे. दरम्यान, हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. दुसरीकडे सांगोला तालुक्यातील हाके यांच्या जुजारपूर येथील घरी गेल्या चार दिवसापासून चूल पेटली नाही. मुलाच्या आठवणीने भावुक झालेल्या हाके यांचे आई वडिलांचे अश्रू अनावर झाले आहेत.

अल्पभूधारक असलेल्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे वडील शेळ्या-मेंढ्या राखायचे काम करतात. त्यांनाही उपोषण करीत असलेल्या मुलाची अवस्था पाहून चिंता वाटत आहे. गेल्या आठ दिवसांपासून समाजासाठी उपोषणाचा लढा देत असताना सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Laxman Hake News )

गुरुवारी हाके यांच्या जुजारपूर या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दुसरीकडे त्यांच्या गावात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. पोटच्या गोळ्याची अवस्था पाहून असे लक्ष्मण हाके यांच्या आई-वडिलांचा जीव तुटत आहे.

ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation) लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. हाके यांच्यासोबत नवनाथ वाघमारे हेही उपोषण करत आहेत. हाके यांच्या उपोषणाला ओबीसी समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मात्र, हाकेंनी मागण्या मान्य होईपर्यत उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारपुढील अडचणीत भर पडली आहे.

आईचे डोळे पाणावले

लक्ष्मण हाके उपोषण करीत असलेल्या ठिकाणी जाऊन आईने भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र, आईची तब्येत बरी नसल्याने आईला येऊ नकोस, असा निरोप लक्ष्मण हाके यांनी दिला. हे सांगताना त्यांच्या आईंचे डोळे पाणावले होते. गेल्या आठ दिवसापासून मुलाच्या पोटात अन्नाचा कण नाही. त्यामुळे आम्हाला तरी कसे अन्न गोड लागेल, असा सवाल लक्ष्मण हाके यांच्या आईने केला आहे.

Laxman Hake
Video Vijay Wadettiwar : लक्ष्मण हाकेंना पाहताच वडेट्टीवारांना अश्रू अनावर! थेट शिंदेंना फोन अन्...

लेकाची अवस्था बघून थंडी-ताप भरला

या उपोषणाची राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. माझ्या लेकाची अवस्था बघून मला थंडी- ताप भरला आहे. सरकार का दखल घेत नाही, हेच आम्हाला कळत नाही. अठरापगड जातीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या तब्येतीसाठी आमचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा, अशी मागणी हाकेंच्या आई वडिलांनी केली आहे.

वडेट्टीवारांना अश्रू झाले अनावर

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetivar) यांनी गुरुवारी उपोषणस्थळी जाऊन हाकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. वडेट्टीवार यांनी यापुर्वीच या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी गुरूवारी उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यांची खालावलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले.

Laxman Hake
'जरांगेंचा बोलविता धनी कोण ?', हाकेंचा वर्मावर घाव | Manoj jarange patil | Laxman Hake

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com