OBC Reservation Protest : आरक्षणाचा प्रश्न पेटणार; मराठे-ओबीसी आमनेसामने येणार? मुंबईत मोर्चा!

Manoj jarange Vs Laxman Hake : मुंबईत 1 सप्टेंबरला ओबीसी आरक्षण बचावसाठी महामोर्चा निघणार आहे. तर, मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी पोलीसांकडे मागण्यात आली आहे.
Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
OBC reservation protest in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

OBC quota protest Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून अंतरवालीऐवजी मुंबईत बेमुदत उपोषण केले जाऊ शकते, असे संकेत दिलेले असतानाच आता ओबीसी आरक्षण बचावसाठीही मुंबईत मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत येत्या 1 सप्टेंबरला मुंबईत ओबीसी आरक्षण बचावसाठी महामोर्चा काढण्याची घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी पोलीसांकडे मागण्यात आली आहे. तर त्यानंतर दोन दिवसांनीच ओबीसी आरक्षण बचावसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा गजबजणार आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येत असल्याचा आरोप करत, आरक्षणाच्या रक्षणासाठी येत्या 1 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईत भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये केली आहे.

आम्हाला कोणाबद्दलही द्वेष नाही, परंतु संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसलेले आरक्षण कशाला हवे? असा थेट सवाल करत सर्व ओबीसी घटकांनी एकवटून मुंबईकडे कूच करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
OBC Reservation : 10 टक्के आरक्षण, ‘कुणबीकरणा’चाही धडाका: OBC आरक्षणाला भगदाड पाडून मराठा समाजच सर्वात मोठा लाभार्थी!

​राज्यात सुमारे 22 लाख 20 हजार 577 कुणबी प्रमाणपत्रे वाटण्यात आली आहेत. मराठा समाजाचे मागासपण नाकारले गेले असतानाही ही प्रमाणपत्रे कशी वाटली? यामुळे मूळ ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये ओबीसींचे प्रचंड नुकसान होणार आहे, असा आरोप हाके यांनी केला.

निवडणुका आल्या की सर्व पक्षांना ओबीसी हवा असतो, मग आता आरक्षणावर गदा येत असताना सर्वपक्षीय ओबीसी नेते गप्प का? पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते, मराठा समाजाला कुणबी मान्य करणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, अशी टीका हाके यांनी केली.

ओबीसींच्या 29 टक्के आरक्षणाला धक्का कसा लागला नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. आता ओबीसी वाचवण्यासाठी लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे सांगत 1 सप्टेंबरच्या महामोर्च्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का, 50 टक्क्यांमध्ये कपात? ग्रामपंचायत निवडणुकीच्याआधी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com