

OM Rajenimbalkar News : मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये ओम राजेनिंबाळकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या प्रवेशापुर्वी पडलेला चेहरा, रडवेले डोळे अन् धीरगंभीर आवाजात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,'सर्वसामान्य माणसासाठी जो लढा मी आजपर्यंत दिलाय आणि त्याला केंद्रबिंदू मानून मी जे काम केलय, तेवढ्याच ताकतीने काम करत राहणार आहे.'
पुढे बोलताना ते म्हणाले, 'महायुतीचा आज निकाल विधान परिषदेचा येतोय, मोठ्या प्रमाणात महायुतीने यश मिळवलं. राज्यामध्ये परत निश्चितपणे जे निवडून आले असतील त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन'
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खासदार फुटल्यानंतर आज आपल्या 20 आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चार आमदार गैरहजर असल्याचे समोर आले आहे. संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस तर सुनील शिंदे हे आमदार या बैठकीला गैरहजर असल्याची माहिती आहे.
फुटलेल्या सर्व सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते हे देखील शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते विशेष विमानाने नाशिकहून मुंबईकडे निघाले आहेत.
एकनाथ शिंदे हे म्हणाले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. सहाही खासदारांना मी शुभेच्छा देतो. शिवसेना परिवारामध्ये मी त्यांचे स्वागत करतो. पक्षात कोणीही नेता नाही. सर्व कार्यकर्ते आहेत. सर्व खासदार हे काम करणारे आहेत. धुरंधर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.