Omraje Nimbalkar News : सांगोल्याचा राजकारणाला वेगळ वळण मिळाले आहे. माजी आमदार गणपतआबा पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. घरासमोर दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्या. भाजप कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. या प्रकरानंतर शेकापने आज सांगोला बंदची हाक दिली आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या स्व. गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील घरावर भाजपच्या रॅलीदरम्यान दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या, ही केवळ धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेली एक अमानुष चाप आहे.
'ही तीच भाजपा आहे का जी स्वतःला “संस्कृतीरक्षक” म्हणवते? पण त्यांच्या रॅलीतून बाहेर येतंय दारूची नशा, गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद!स्व. गणपतराव आबा सारख्या लोकनेत्यांच्या घरावर अशी घाणेरडी कृत्यं करून भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे की सत्ता जेव्हा अहंकाराच्या नशेत चढते, तेव्हा माणुसकीचं भान हरवतं.', असे देखील ते म्हणाले.
'ज्यांच्या घराचं दार बंद असतानाही आदर्शाचा सुगंध दरवळतो, त्या देशमुख कुटुंबावर झालेला हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील अधःपाताचं जिवंत उदाहरण आहे.महाराष्ट्र म्हणजे संयम, आदर आणि संस्कारांची भूमी. पण सध्याचं सरकार हेच संस्कार पायदळी तुडवत आहे. ना शिष्टाचार उरलेत, ना आदर्श.ही केवळ बाटली फेकण्याची घटना नाही, तर महाराष्ट्राच्या विचारसरणीवर फेकलेली घाण आहे. दारूच्या नशेत बुडालेली ही सत्ता लोकांच्या जागृतीसमोर फार काळ टिकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही.', असा इशारा देखील ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.