Loksabha Election : महाविकास आघाडी, महायुतीच्या जागावाटपाची केवळ चर्चाच; फॉर्म्युला ठरण्यास फेब्रुवारी उजाडणार

Political News : जागावाटपासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून चर्चेचे गुऱ्हाळ लांबवले जात आहेत.
Loksabha Election
Loksabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी इंडिया आघाडी व एनडीएच्या बैठकांवर बैठका दिल्लीत होत आहेत. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडीची किंवा महायुतीच्या घटक पक्षांची जागावाटपासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगून चर्चेचे गुऱ्हाळ लांबवले जात आहेत.

महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बैठकीनंतर फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात असले तरी मात्र या केवळ चर्चाच किंवा महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यासाठी फेब्रुवारी महिना नक्कीच उजाडेल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यानंतर मार्च महिन्यात उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Loksabha Election
Modi Vs Shinde : मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; सुशीलकुमार शिंदेंनी फुंकले रणशिंंग

महाविकास आघाडीच्या घटकपक्षात काँग्रेसकडे (Congress) ठाकरे गट (shivsena Thackrey group) जादा जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे ठाकरे गट शेवटच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त जागा पदरात पडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. ठाकरे गटांने यापूर्वी भाजपाला जागावाटप करताना जेरीस आणले होते. त्यामुळे शिवसेना हव्या तेवढ्या जागा पदरात पडल्याशिवाय काँग्रेसला जागा सोडणार नाही.

दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गट अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत, तर वंचित आघाडी एक-दोन जागेवर समाधान मानेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आघाडीचे जागावाटप रखडले आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी कितीही जळवून घ्या, असे आदेश दिले असले तरी काँग्रेसचे राज्यातील नेते मानतील, असे वाटत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असे नाही. महायुतीमध्ये भाजप ३० जागांवर आग्रही आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. त्यांना त्या जागा सोडल्या तर अजित पवार गटाला ५ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे हे घटकपक्ष मान्य करतील का, असा प्रश्न आहे.

भाजपने लोकसभेला जादा जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्याबदल्यात विधानसभेच्या जादा जागा देऊ शकते. मात्र, यावर महायुतीमधील सर्व पक्षांचे समाधान होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीचा फॉर्म्युला ठरण्यासाठी फेब्रुवारी महिना नक्कीच उजाडेल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

(Edited by Sachin Waghmare)

R...

Loksabha Election
loksabha Election : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं घोडं अडलं 'या' चार मतदारसंघांवर

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com