Modi Vs Shinde : मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; सुशीलकुमार शिंदेंनी फुंकले रणशिंंग

Solapur Political News : राम मंदिर हा भारतीय जतना पक्ष, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे.
Narendra Modi-Sushilkumar Shinde
Narendra Modi-Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जरी दौरे केले, तरी लोकांच्या मनामध्ये जे काही असेल, ते निवडणुकीमध्ये दाखवतात. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना स्पष्ट केले. (No reason to fear Modi's Maharashtra's visits : Sushilkumar Shinde)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर दुपारी मुंबईत त्यांचा कार्यक्रम आहे. तसेच, येत्या काही दिवसांत ते सोलापूरच्याही दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी मोदींच्या दौऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi-Sushilkumar Shinde
Modi Nashik Tour : काळाराम मंदिरात मोदींचा अखंड भारतासाठी संकल्प...

राममंदिर प्राणप्रतिष्ठापना आणि त्यावरून उठलेल्या वादंगावरही माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राम मंदिर हा भारतीय जतना पक्ष, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. सुरुवातीपासूनच ते हा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करीत होतो. आता त्यात नवीन काहीही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पण, रामनवमीऐवजी २२ जानेवारीला राम मंदिराच्या होणाऱ्या उद्घाटनावर मात्र काहीशी टीकात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिराचे उद्‌घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना ही रामनवमीच्या मुहूर्तावर करण्याऐवजी 22 जानेवारीला त्यांना करावी, असे वाटते. ठीक आहे, असा चिमटाही शिंदे यांनी मंदिराच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या वापराबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर मात्र शिंदे यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर काय होतं ते बघूयात. मात्र, आताच त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही.

Narendra Modi-Sushilkumar Shinde
Solapur News : भाजपवाले यापुढे मतदानही होऊ देतील की नाही, ही शंकाच : काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली भीती

सोलापुरातील आमच्या चार हुतात्म्यांनी 12 जानेवारी रोजी बलिदान दिलं, त्यांचा हा आजचा 'अमृत दिवस' आहे. त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणीने येथे येतो. पूर्वी आम्ही पहाटे पाच वाजता अभिवादन करायला यायचो. सोलापुरातील चार हुतात्मे आम्हाला 12 जानेवारीला सोडून गेले, मात्र त्यांनी देश स्वतंत्र केला, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R...

Narendra Modi-Sushilkumar Shinde
Raver Loksabha : रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजप दाखवेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com