Operation Tiger : श्रीकांत शिंदें, श्रीरंग बारणेंना केंद्रात मंत्रिपद? उद्धव ठाकरेंचे निम्मे खासदार फोडण्याची तयारी!

Shrikant Shinde Srirang Barne Eknath Shinde : दिल्ली दौऱ्यावरून परतताच एकनाथ शिंदेंनी ऑपरेश टायगर अॅक्टिव्ह केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
Shrikant Shinde Srirang Barn
Shrikant Shinde Srirang Barnsarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून परतले आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अचानक या भेटीमागे नेमके काय कारण होते याची चर्चा सुरू झाली आहे. 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार आपल्या संपर्कात असल्याचे शिंदेंनी पंतप्रधानांना सांगितले. त्यांना कसे पक्षात घेता येईल, यासाठी चर्चा केली.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिशन टायगर अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंकडे नऊ खासदार आहेत. त्यातील पाच पेक्षा अधिक खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरेंच्या खासदारांना फोडून आपली संख्या वाढवून दोन मंत्रिपद मिळवण्याची शिंदेसेनी रणनीती आहे.

'साम टिव्ही'च्या वृत्तानुसार ठाकरेंचे खासदार फोडून श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांना केंद्रात मंत्री करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंचे जास्तीत जास्त खासदार सोबत घेत केंद्रात वजन वाढवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्लॅन आहे.

Shrikant Shinde Srirang Barn
Pune ZP News: पहिल्याच दिवशी ZP विरोधकांची खेळी! सत्ताधारी फिरले 'दारोदारी'

प्रताप जाधव राज्यमंत्री

एकनाथ शिंदेंची शिवसेना ही केंद्रातील सत्तेत सहभागी आहे. सध्या शिंदेंकडे सात खासदार आहेत. केंद्रातील सत्तेत शिदेंना वाटा मिळाला असला तरी त्यांना केवळ एकच राज्यमंत्रिपद मिळाले आहे. खासदार प्रताप जाधव यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात आले आहेत. ते मोंदीच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.

Shrikant Shinde Srirang Barn
Captain Ashok Kharat Crime : राजकारण्यांचा ज्योतिषी अशोक खरात अनेक कोटींचा मालक कसा झाला? धक्कादायक माहिती समोर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com