

Nashik Crime News: नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ज्योतिषाची दुकानदारी उघड झाली आहे. या संदर्भात वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. अशोक खरात याने जादूटोणा आणि ज्योतिष या माध्यमातून महिलेला भीती दाखवली. त्या माध्यमातून घाबरलेल्या महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. गेली काही वर्ष महिलांचे शोषण सुरू असल्याचे उघड झाले.
न्यायालयाने वादग्रस्त ज्योतिषी आणि राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय अशोक खरात याला पोलीस कोठडी सुनावली आहे. येत्या 24 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाचे काही नेते, राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी नेते चर्चेत आले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या पंधरा वर्षात ज्योतिष आणि राजकीय नेत्यांना भविष्य सांगण्याचा खरात याचा व्यवसाय होता. या माध्यमातून अनेक राजकीय नेते त्याच्या संपर्कात आले होते. त्याचा उपयोग त्याने विविध प्रकारे करून घेतला. अशोक खरात याची पोलीस चौकशी करीत आहे. या दरम्यान त्याच्या सात ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. त्याची माहिती ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले.
अशोक खरात याने दहा कोटीहून अधिक रक्कम खर्चून मिरगाव (सिन्नर) मंदिराचे बांधकाम हाती घेतले आहे. सध्या ते अर्धवट आहे. याच गावात त्याचे आलिशान फार्म हाऊस आहे. कोट्यवधी रुपयांची ४५ एकर जमीन देखील असल्याचे बोलले जाते.
अशोक खरात याची नाशिक शहरात पाथर्डी येथे दीडशे कोटी रुपयांची जमीन आहे. यामध्ये विविध भूखंड आहेत. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेले हे भूखंड मौल्यवान आणि मोठी मागणी असलेले आहे. खरात याचा पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि दुसरी मुलगी तृप्त बाला तिच्या नावावर पाथर्डी आणि गवळणी शिवारात शेतजमीन आहे.
ओझर (निफाड) विमानतळाजवळ देखील त्यांनी मोठी जमीन खरेदी करून ठेवली आहे जानोरी आणि दहावा मैल येथील या जमिनीचे मूल्य पाच कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. अशोक खरात याने गेली पंधरा वर्षे नाशिक शहरात ज्योतिष सांगण्याचं व्यवसाय केला. त्यातून मोठे राजकीय कनेक्शन निर्माण केले. या माध्यमातून त्याच्या आर्थिक स्थितीचा अतिशय वेगाने विस्तार झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.