Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर धक्कादायक अपडेट; काश्मीरमध्ये 2 हजार पर्यटक अडकले, गोळीबारात महाराष्ट्रातील 2 जणांचा मृत्यू

Pahalgam Terror Attack Updates : जम्मू काश्मीर पहलग्राममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा पर्यटकांना धर्म विचारला. हिंदू असल्याचं सांगतानाच त्यांनी केलेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे.
Pahalgaam Terror Attack .jpg
Pahalgaam Terror Attack .jpgSarkarnama
Published on
Updated on

Jammu And Kashmir News: मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्ममध्ये जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22) मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येत असून जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Pahalgaam Attack) 2 हजार पर्यटक अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आहे.

जम्मू काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा पर्यटकांना धर्म विचारला. हिंदू असल्याचं सांगतानाच त्यांनी केलेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पहलगाममधील या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे. हल्ल्यासाठी आलेले दहशतवादी हे पोलिसांच्या वेशात आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pahalgaam Terror Attack .jpg
BJP Vs ShivSena : गणेश नाईकांच्या वर्चस्वाला 'ठाण्यातून' हादरे; नवी मुंबईत शिंदे 'भाजपला' डोईजड ठरणार!

ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. तसेच सौदी अरेबियाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाह यांच्याशी फोनवरुन हल्ल्याची माहिती घेतली आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील पाच जणांचं कुटुंब अडकलं आहे. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालून फोटो काढत असतानाच त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला.

यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर असून दुसरा पुरुषही जखमी आहे. 

Pahalgaam Terror Attack .jpg
Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!

मोदी सरकारनं आपल्या दुसर्‍या टर्ममध्ये जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवलं होतं. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच या पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांची संख्या कमी करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्यामुळे मोदी सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

370 कलम हटवल्यानंतर मोदी सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले थांबल्याचा दावाही केला जात होता. पण आता मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्ममध्ये मात्र,दहशतवादी हल्ल्यात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्या ठिकाणी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच या पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी,त्यांची संख्या कमी करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com