

Mumbai News : पालघर येथील मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकारे डॉक्टर अथवा कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. अशास्वरूपाचा गंभीर प्रकार करणाऱ्यांना शिवसेना पाठीशी घालणार नाही. एखाद्या रुग्णाच्या बाबतीत गैरप्रकार घडलाच असेल तर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याची गरज होती. या मारहाण प्रकरणाचे शिवसेना कधीच समर्थन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
मारहाण करणारे राहुल घरत नामक जे पदाधिकारी आहेत. त्या पदाधिकाऱ्याचे शिवसेना पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, डॉक्टरला केलेली मारहाण असेल अथवा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण असेल, ती खपवून घेतली जाणार नाही. शिवसेना त्याचे कधीच समर्थन करणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'खोटी कागदपत्रे देऊन निवडणूक लढणे चुकीचे आहे. अशा प्रकारे कोणत्याही पक्षाच्या नेत्याने जर निवडणूक लढवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच, खोटी कागदपत्रे सादर करणे व माहिती लपविण्याचा प्रकार चुकीचा आहे. यामध्ये काही गैरप्रकार झाला असेल तर कारवाई होणारच, असे मत त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची मोठी इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला रेल्वे किंवा अन्य वाहतुकीचे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.