Nilesh Ghaywal News : पोलिसांनी नाक दाबताच निलेश घायवळ गुडघ्यावर, पत्नी आणि मुलाला परत पाठवलं

Nilesh Ghaywal Pune Police : पोलिसांना चकवा देत परदेशी पळालेल्या गुंड निलेश घायवळची पत्नी आणि मुलगा भारतात परतले आहेत. निलेश अजुनही युरोपमध्ये असल्याची माहिती आहे.
Gangster Nilesh Ghaywal
Gangster Nilesh Ghaywalsarkarnama
Published on
Updated on

Nilesh Ghaywal News : कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पोलिसांना चकवा देत युरोपमध्ये गेला होता. त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घायवळची दहा बँक खाती गोठवली आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर अवघ्या दोन दिवसांत निलेश घायवळचा मुलगा आणि पत्नी भारतात परतले आहेत.

पत्नी आणि मुलगा परतला तरी निलेश घायवळ हा अजुनही युरोपमध्ये असल्याची माहिती आहे. तो 90 दिवसांचा व्हिसा घेऊन युरोपला गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, निलेशचा पत्नी आणि मुलगा भारतात परतले असले तरी ते अजुनही पुण्यात दाखल झाले नाहीत. पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने ते पुण्याबाहेरच थांबले असल्याचे सांगितले जात आहे. घायवळ टोळीकडून एक जणावर कोथरुडमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या गुंडांना अटक केली होती. तसेच घायवळच्या घरावर छापा टाकून दोन चारचाकी आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या.

Gangster Nilesh Ghaywal
Maharashtra Government : फडणवीस सरकार रेकॉर्ड करणार; एकाच दिवशी तब्बल 10,309 नियुक्त्या...

38 लाख जप्त

पोलिसांनी निलेश घायवळची दहा बँक खाती गोठवून त्यातील 38 लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी जेव्हा घायवळच्या घरावर छापा मारला होता तेव्हा तो तेथे नव्हता. मात्र, नंतर पोलिसांना कळाले की तो परदेशात गेला आहे. घायवळवर हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हा दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला, याबाबत त्याला कोणी मदत केली याची देखील चौकशी पोलिस करत आहेत.

Gangster Nilesh Ghaywal
Chhannulal Mishra Passes Away : PM मोदींना वाराणसीला आणणारा चेहरा काळाच्या पडद्याआड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com