helicopter technical snag : पुन्हा एकदा मोठा धोका टळला, तीन दिवसांत दुसरी घटना; पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; ऐनवेळी सातारा दौरा रद्द

Pankaja Munde Latest news : मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा प्रचार गुरुवारी थांबणार आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने नेत्याचे दौरे वाढले आहेत. त्यामुळे कमी वेळात अधिक ठिकाणी पोहचण्यासाठी खासगी कंपन्याचे हेलीकाॅप्टर, छोट्या विमानाचा वापर केला जात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे त्यांना नियोजित सातारा दौरा रद्द करावा लागला आहे. विशेष म्हणजे मंगळवारीच त्यांच्या हेलीकाॅप्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारदौऱ्यासाठी पंकजा मुंडे हवाईमार्गे प्रवास करत होत्या. त्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाण होऊ शकले नाही. सलग तीन दिवसात त्यांचे हेलिकाॅप्टर दुसऱ्यांदा बंद पडले आहे.

गुरुवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने त्या प्रचारासाठी मुंबईतून साताऱ्याला जाणार होत्या. मात्र, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंकजा मुंडे या मुंबईतून साताऱ्याला जाणार होत्या. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौराही रद्द करावा लागला.

Pankaja Munde
BJP Politics : भाजपला आव्हान देणारा शहराध्यक्ष ठरला फुसका बार! सपशेल शरणागती; संकटमोचक महाजनांनी फिरवली चावी!

पंकजा मुंडे यांनी सोमवारी हेलिकाॅप्टरमधून प्रवास केला होता. या हेलिकाॅप्टरमध्ये बसल्यानंतर त्यांना खूप जुने वाटले होते. खूप आवाज येत होता, असे देखील निरीक्षण पंकजा मुंडे नोंदवले. यानंतर हेच हेलिकाॅप्टर उडणार नसल्याचा निरोप पंकजा मुंडे यांना मंगळवारी मिळाला. यावेळी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर येथील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी दुसरे विमान मुंबईहून मागवण्यात आले होते. त्याना जवळपास चार ते पाच तास हेलीकॉप्टरची वाट पाहावी लागली होती.

Pankaja Munde
BJP Politics : भाजपला आव्हान देणारा शहराध्यक्ष ठरला फुसका बार! सपशेल शरणागती; संकटमोचक महाजनांनी फिरवली चावी!

दरम्यान, शिवसेनेचे (Shivsena) मंत्री गुलाबराव पाटील बुधवारी लातूर दौऱ्यावर होते. यांच्या लातूर येथून नियोजित विमानाचे उड्डाण रद्द करावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लिअरन्स न मिळणे आणि तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगितले जाते. एका खासगी कंपनीचे सहा आसन क्षमतेचे विमान लातूर विमानतळावरून नियोजित वेळेनूसार साडेचार वाजता उड्डाण करणार होते. हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक क्लिअरन्सची प्रतीक्षा पाच वाजेपर्यंत करण्यात आली. मात्र, ठराविक वेळेत क्लिअरन्स न आल्याने पायलटने उड्डाणास असमर्थता दाखवली.

Pankaja Munde
BJP Politics : भाजपला आव्हान देणारा शहराध्यक्ष ठरला फुसका बार! सपशेल शरणागती; संकटमोचक महाजनांनी फिरवली चावी!

लातूर येथून विमान उड्डाणास मर्यादा असल्याने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गुलाबराव पाटील यांना कारने प्रवास करावा लागला. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रेणापूर तालूक्यातील कामखेडा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

Pankaja Munde
Congress Shiv Sena UBT Alliance : महापौर निवडणुकीआधी ट्विस्ट, स्वीकृतसाठी सस्पेन्स अन् एमआयएमविरोधात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com