भाजपने नागपूरच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर केले असून 6 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
स्वीकृत सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सर्व पक्षांकडून जोरदार राजकीय फिल्डिंग सुरू आहे.
एमआयएमला रोखण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेने महाविकास आघाडी मजबूत केली असून नगरसेवकांची संख्या 36 झाली आहे.
nagpur mayor election News : नागपूर शहराचा नवा महापौर कोण होणार याची घोषणा भाजपने केली आहे. एवढेच नव्हे तर उपमहापौरांचे नावही जाहीर केले आहे. सहा फेब्रवारीला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. सर्वकाही निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्वीकृत सदस्यांकडे लागले आहे. भाजपने बंडखोरी रोखताना अनेकांना स्वीकृतचे गाजर दाखवले आहे. काँग्रेसने सर्वच बंडखोरांना माघार घ्यायला लावली होती. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यांसाठी मोठी फिल्डिंग लागली आहे.
यातच आता नागपूर महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांनी स्थापन केलेल्या नागपूर महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक सामील झाले आहेत. त्यामुळे आघाडीच्या नगरसेवकांची संख्या एकूण ३६ झाली आहे. या विलीनीकरणामुळे आघाडीच्या स्वीकृत सदस्यांची संख्येत एकने भर पडू शकते. एमआयएमला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी आघाडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३४ तर उद्धव सेनेचे दोन सदस्य निवडून आले आहे. काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच नगर विकास आघाडी स्थापन करून गट नोंदणी केली आहे. संजय महाकाळकर यांना काँग्रेसचे गटनेते आणि विरोधीपक्षनेते करण्यात आले आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या दोन नगरसेवकांमध्ये महानगर प्रमुख किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे यांचा समावेश आहे.
नागपूरमध्ये नगरसेवकांची एकूण संख्या १५१ आहे. एकूण १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती महापालिकेवर केली जाणार आहे. भाजपकडे एकूण १०२ नगरसेवक आहेत. भाजपकडे असलेल्या संख्याबळानुसार सात स्वीकृत सदस्यांच्या कोटा त्यांना मिळणार आहे. त्यानंतर सर्वाधिक नगरसेवकांची संख्या ३४ काँग्रेसकडे असल्याने त्यांच्या वाट्याला दोन सदस्य येणार आहेत.
त्यानंतर काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक असे एकूण सहा नगरसेवक काँग्रेस आघाडीचे उरतात. नागपूरमध्ये एमएमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने उरलेला दहावा स्वीकृत सदस्य एमएमआयच्या वाट्याला जाऊ शकतो. मात्र आता उद्धव सेना काँग्रेस आघाडीत सहभागी झाल्याने दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी सहा नगरसेवक शिल्लक उरतात. यासाठी महापालिका प्रशासन कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते हे पहावे लागणार आहे.
ईश्वर चिठ्ठीसुद्धा काढली जाऊ शकते. एमआयएम आणि मुस्लिम लीग एकत्र आल्यास त्यांच्याकडे १० नगरसेवक बळ तयार होते. मात्र एमआयएम आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे गटनोंदणी केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक नगरसेवक आहे. त्यांनी आपला निर्णय अद्याप कळवलेला नाही. त्या काँग्रेस आघाडीत सहभागी झाल्यास एमएमआयएमची आशा संपुष्टात येऊ शकतो. मुस्लिम लीगने एमआयएमसोबत जाण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यांच्याकडे काँग्रेस आणि भाजपचे असे दोन्ही पर्याय खुले आहेत.
1. नागपूर महापौर निवडणूक कधी होणार आहे?
6 फेब्रुवारी रोजी नागपूर महापौरपदाची निवडणूक होणार आहे.
2. भाजपने काय घोषणा केली आहे?
भाजपने महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत.
3. स्वीकृत सदस्य का महत्त्वाचे ठरणार आहेत?
स्वीकृत सदस्यांमुळे सत्तास्थापनेचे गणित बदलू शकते, त्यामुळे ते निर्णायक ठरणार आहेत.
4. महाविकास आघाडीत कोण कोण सहभागी झाले आहेत?
काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगरसेवक महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत.
5. एमआयएमचा या घडामोडींशी काय संबंध आहे?
एमआयएमला सत्तेपासून रोखण्यासाठीच ही आघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.