BJP voter list issue : खबरदार! चुकीची माहिती पसरवल्यास; आयुक्त डांगे 'अ‍ॅक्शन मोड'वर, भुतारेंच्या अडचणी वाढल्या...

Yashwant Dange Reacts to Nitin Bhutare BJP Voter List Complaint : सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी मतदार याद्यांवर राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्ररीवर अहिल्यानगर महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Yashwant Dange Reacts
Yashwant Dange ReactsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने भाजप पदाधिकाऱ्याकडेच मतदार यादी तयार करण्याचे काम दिल्याचे तक्रार सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली.

या प्रकाराचे वृत्त समोर येताच, महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे 'अ‍ॅक्शन मोड'वर आले आहेत. 'मतदार याद्यांचे काम महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असून, याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. मतदार यादी संदर्भात चुकीची माहिती पुरवणाऱ्या नितीन भुतारे यांच्यावर महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येईल,' असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.

महापालिका (Corporation) प्रशासनाकडून मतदार याद्यांच्या कामकाजाविषयी माहिती देताना असे सांगण्यात आले की, "महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीचे काम महापालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच सुरू आहे. विधानसभा मतदार संघाच्या यादीची मूळ पीडीएफ कॉपी महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याची प्रिंट खासगी झेरॉक्स सेंटरवरून काढण्यात आली आहे."

कोणत्याही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचे काम देण्यात आलेले नाही. नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये. मतदार (Voter) याद्यांविषयी कोणतीही माहितीची प्रशासनाकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. तसेच, मतदार यादी संदर्भात चुकीची माहिती पुरवणाऱ्या नितीन भुतारे यांच्यावर महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

Yashwant Dange Reacts
BJP officer voter list update issue : महापालिकेची मतदार यादी बनवतोय भाजपचा पदाधिकारी; खळबळजनक प्रकाराची थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीविषयी सामाजिक कार्यकर्त्यांकडून चुकीची माहिती प्रसिद्धीला दिली जात आहे. परंतु असा कोणताही प्रकार घडलेला नाही. महापालिकेला विधानसभेची 1 जुलैची मूळ मतदार यादीची सॉफ्ट कॉपी प्राप्त झाली होती. ती खासगी झेरॉक्स सेंटरवरून प्रिंट काढून घेतलेली आहे. महापालिका कर्मचारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम करत आहेत, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

Yashwant Dange Reacts
Asim Munir powers : लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींपेक्षा जास्त अधिकार? भारताला असू शकतो धोका?

प्रारूप यादी 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

यानुसार कंट्रोल चार्ट भरल्यानंतर निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअरमधून प्रारूप याद्या तयार होणार आहेत. त्या प्रारूप याद्या 14 नोव्हेंबरला प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत विधानसभेची मूळ मतदार यादीची प्रिंट काढण्याव्यतिरिक्त खासगी व्यक्तींकडून कोणतेही काम करण्यात आलेले नाही, असा दावा आयुक्त यशवंत डांगे यांनी केला.

आयुक्त डांगे यांचे आवाहन

असे असताना, सामाजिक कार्यकर्त्यांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. यासंदर्भात महापालिकेकडून कारवाई होईलच. पण नागरिकांना मतदार यादीविषयी काही माहिती पाहिजे असल्यास, थेट महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डागे यांनी केले आहे.

नितीन भुतारेंचा नेमका काय आरोप

अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीत नियम धाब्यावर बसवत, मागील महिनाभरापासून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मतदार यादी तयार करण्याचे व छपाई करण्याचे काम महापालिकेने व संबंधित निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्याने दिल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे. यामुळे अहिल्यानगर शहरातील इच्छुक, उमेदवार तसेच भाजपचे विविध पदाधिकारीही त्या व्यक्तीच्या संपर्कात असून, मतदार यादी प्रक्रियेतील गोपनीयता धुळीत मिळाल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com