Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Manoj Jarange Patil : सोलापुरात रिक्षाचालकांपासून उच्चशिक्षित दीडशे जणांना जरांगे पाटलांकडून विधानसभा लढवायचीय!

Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी प्रशालेत आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
Published on

Solapur, 19 October : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यात आज सकल मराठा समाजाच्या वतीने इच्छुकांचे अर्ज आणि त्यांचे कार्य अहवाल घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात रिक्षाचालकापासून उच्चशिक्षित अशा दीडशेहून अधिक जणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आचारसंहिता लागेपर्यंत मराठा समाजाला (Maratha community) ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विनंती केली होती. मात्र, राज्य सरकारने जरांगे पाटील यांची मागणी मान्य न केल्याने त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल होता. त्यातही त्यांचा रोख हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी प्रशालेत आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल दीडशेहून अधिक जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.

Manoj Jarange Patil
Pandharpur Politic's : परिचारक समर्थकांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; उमेदवारीच्या मुद्यावर पवारांचे सर्व्हेकडे बोट

सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (ता. 19 ऑक्टोबर) जिल्ह्यातील 11 मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. छत्रपती शिवाजी प्रशालेत झालेल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात 30 जणांनी आपापले कार्य अहवाल सादर केले, तर 120 जणांनी यापूर्वीच अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष जाऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत.

इच्छुक उद्या अंतरवाली सराटीत जाणार

विधानसभा निवडणुकीसाठीचे सर्व इच्छुक हे उद्या रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) सकाळी सोलापूरहून अंतरवाली सराटीला जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून जरांगे पाटील एकाची उमेदवारी जाहीर करणार आहेत. उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट येथील उमेदवार सोलापूरमधून, तर इतर मतदारसंघातील उमेदवार त्यांच्या गावातून अंतरवाली सराटीला निघणार आहेत.

मोहोळ व माळशिरस या राखीव जागांवर अनुसूचित जातीचे उमेदवार तर शहर मध्य, सोलापूर दक्षिण व अक्कलकोट या मतदारसंघात इतरधर्मीय उमेदवार असू शकतात.

Manoj Jarange Patil
Vijaysinh Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही विजयदादांना मानाचे पान...

मीनल साठे, जाधव, आंधळकर, प्रियदर्शिनी कदम प्रमुख इच्छुक

सकल मराठा समाजाकडून माढ्यातून माजी आमदार ॲड धनाजी साठे यांच्या सून ॲड. मीनल साठे, सोलापूर शहर उत्तरमधून राजन जाधव, भक्ती जाधव, बार्शी मतदरासंघातून भाऊसाहेब आंधळकर इच्छुक आहेत. सोलापूर शहर उत्तरमधून इच्छुक असलेले सुनील माने हे रिक्षाचालक आहेत, तर मंगळवेढा येथील प्रियदर्शिनी कदम-महाडिक या विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या आहेत. त्याही पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com