धक्कादायक! चौघांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने संपवलं जीवन! बहिणीसमोरच नराधमाने केला होता बलात्कार?

Atpadi Girl Dies by Suicide After sexual harassment : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली असून एका दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय. धक्कादायक म्हणजे तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.
sexual harassment case
sexual harassment caseSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीने चौघा तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या चौघातील एकाने त्या विद्यार्थिनीवर तिच्या बहिणीच्या समोरच बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. तर होणाऱ्या त्राला कंटाळून तिने आज पहाटे आपली जीवन यात्रा संपली. यामुळे संतप्त झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी एकाला बेदम चोप दिल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (16-year-old schoolgirl in Atpadi, Sangli district, dies by end of life after allegedly being subjected to rape by four youths)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला गावातील चार तरूण त्रास देत होते. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. तर तिच्याकडे शरीर सुखाच्या मागणी गेली जात होती. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे यातील एकाने तिच्यावर बहिणीच्या समोरच बलात्कार केला होता. या प्रकरणी चौघावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केलीय.

दरम्यान यातील एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. दोघे पसार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत निषेध नोंदवला असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत दिवसभर पोलीस ठाण्यासमोर तळ ठोकला होता.

sexual harassment case
Beed sexual harassment case : बीडमधील लैंगिक छळप्रकरणात रूपाली चाकणकरांचा 'मोठा' दावा; पवार अन् खाटोकरवर आणखी एक गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकत होती. पण गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात (सर्व रा. करगणी) आणि अनिल नाना काळे (रा. बनपुरी) हे तिचा पाठलाग करत होते.

तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच घरच्या मोबाईलवर फोन करून त्रास दिला जात होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती. यातील राजू गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता. ती तीने अनेकदा धुडकावली होती. त्यानंतर राजू गेंड याने जबरदस्तीने तिला गावातील एका खोलीवर नेत बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे हा अत्याचार तिच्या बहिणीच्या समोरच झाला करण्यात आला. तसेच या घटनेचा व्हिडिओही बनवला होता. त्याचाच वापर करून तो तिला भीती दाखवत होता.

याच भीतीमुळे ती तणावाखाली वावरत होती. या तरूणांचा त्रास वाढत चालल्याने रविवारी (ता.7) रात्री तिने जेवताना पालकांना सारी कहाणी सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे ठरले होते. पण आता तक्रार देण्याच्याआधीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे पसार

पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर प्रथमदर्शनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण आता लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघे पसार असून एकाला अटक केली आहे.

sexual harassment case
Nair Hospital Sexual Harassment Case: नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल

एकाला बेदम चोप

पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. या प्रकरणातील रामदास गायकवाड याला ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. तर मुख्यआरोपी राजू गेंड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com