Nair Hospital Sexual Harassment Case: नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल

CM Eknath Shinde on nair hospital case sexual harassment medical student: मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या डीनची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
Nair Hospital Sexual Harassment Case
Nair Hospital Sexual Harassment CaseSarkarnama
Published on
Updated on

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital Case) वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा (sexual harassment medical student) गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

एका सहयोगी प्राध्यापकावर संबधीत तरुणीने आरोप केला होता. त्या प्राध्यापकाला निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवण्यात आली आहे. या समितीकडून सादर करण्यात येणाऱ्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Nair Hospital Sexual Harassment Case
BRS Merger in Sharad Pawar NCP: BRS गाशा गुंडाळणार...; शरद पवारांच्या NCP मध्ये विलीन होणार?

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

"आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे,'असे मुख्यमंत्री म्हणाले.

Nair Hospital Sexual Harassment Case
Devendra Fadnavis: लोकसभेत वोट जिहाद, देवेंद्र फडणवीस यांचा रोष कोणावर ?

रुग्णालयात लैंगिक छळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत एमबीबीएस विद्यार्थिनीने तक्रार केली आहे.

मनसे नेता संदीप देशपांडे यांनी या प्रकरणावर आवाज उठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेतली आहे. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली करण्यात आली आहे. लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने केलेल्या चौकशीत हे तथ्य आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com