Solapur Dcc Bank Election : सोलापूर डीसीसी बॅंकेच्या मैदानात 1 खासदार, 15 आजी-माजी आमदारांसह 201 रथी महारथी उतरले

Solapur Political News : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी २०१ उमेदवारांनी २३८ अर्ज दाखल केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी आणि अनेक आजी-माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Solapur Dcc Bank Election
Solapur Dcc Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 30 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण २०१ जणांनी २३८ अर्ज दाखल केले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजीत पाटील, तर जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, प्रशांत परिचारक, दिलीप माने, राम सातपुते, श्यामल बागल हे आजी माजी आमदार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (ता. ३० ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता.

उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (ता. २ नोव्हेंबर) दिवसभर जिल्हा बँकेच्या सभागृहात होणार आहे. छाननीमध्ये कोणाचे अर्ज अपात्र ठरतात आणि कोणाचे अर्ज पात्र ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने डीसीसीच्या राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.

बहुतांश माजी संचालकांनी स्वतःसह घरातील युवा सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे छाननीत माजी संचालकांचे अर्ज अपात्र झालेच, तर त्यांच्याच कुटुंबातील युवा सदस्य संचालक म्हणून बँकेत येणार आहेत.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (११ जागा)

- अक्कलकोट (३ व्यक्ती, ५ अर्ज) : सचिन कल्याणशेट्टी, संजीव पाटील, नागूर विश्वेश्वर

- बार्शी (२ व्यक्ती, ६ अर्ज) : राजेंद्र राऊत, रणवीर राऊत

- करमाळा (३ व्यक्ती, ५ अर्ज) : जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, सुभाष गुळवे

- माळशिरस (६ व्यक्ती, ७ अर्ज) : सुभाष निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शहाजीराव देशमुख, संग्रामसिंह जहागिरदार, ज्ञानराज पाटील.

- माढा (६ व्यक्ती, १० अर्ज) : संजयमामा शिंदे, रणजित शिंदे, यशवंत शिंदे, गणपतराव साठे, भारत शिंदे, संजय कोकाटे

Solapur Dcc Bank Election
Solapur Dcc Bank : भाजपने सोलापूर DCC बॅंकेत उघडले विजयाचे खाते ; राजन पाटील, राजेंद्र राऊत, बबनराव आवताडेंची बिनविरोध निवड निश्चित, या 3 नेत्यांनाही संधी

- मंगळवेढा (३ व्यक्ती, ६ अर्ज) : बबन आवताडे, सुशील आवताडे, सिद्धेश्वर आवताडे

- मोहोळ (२ व्यक्ती, २ अर्ज) : राजन पाटील, विक्रांत पाटील

- पंढरपूर (४ व्यक्ती, ६ अर्ज) : प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, प्रणव परिचारक, कल्याण काळे

- सांगोला (११ व्यक्ती, ११ अर्ज) : बाबासाहेब देशमुख, अतुल पवार, पोपट गडदे, रुपाली लवटे, सुभाष पाटील, मारुती ढाळे, गजेंद्र कोळेकर, चेतनसिंह केदार, विलास पाटील, सिद्धेश्वर मेटकरी, संजय इंगोले

- उत्तर सोलापूर (४ व्यक्ती, १० अर्ज) : दिलीप माने, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, बाबासाहेब पाटील

- दक्षिण सोलापूर (३ व्यक्ती, ४ अर्ज) : सुरेश हसापुरे, श्रीदिप हसापुरे, भारती शिवदारे

महिला : २ जागा (३४ व्यक्ती, ३६ अर्ज)

राधा सुरवसे, अस्मिता गायकवाड, मंदाकिनी गडदे, सृष्टी टिक्के, निलाबाई काटकर, सविता गायकवाड, सिंधू सुरेश पाटील, रोहिणी तडवळकर, शोभा बनशेट्टी, इंदुमती अलगोंड, रुपाली लवटे, नीता गुंड, प्रियंका भगत, आशा घावटे, रुपमती साळुंखे, माजी आमदार शामल बागल, रश्मी बागल, वनिता गुळवे, अश्विनी बागल, वनिता लवटे, राणी वारे, पूजा चौगुले, सिंधू प्रताप पाटील, सुवर्णा दळवे, नंदाबाई केवारे, रुक्मणी रणदिवे, वैशाली चौगुले, अर्चना घाडगे, मीनल साठे, वीणा जोकारे, सुनीता खुने, छायादेवी नारनवर, त्रिवेणी आकळे, कविता खडतरे.

अनुसूचित जाती/जमाती : १ जागा (१६ व्यक्ती, १६ अर्ज)

राम सातपुते, बिराप्पा इंगळे, सत्यवान कांबळे, शंकर गायकवाड, विष्णू वाघमारे, जयंत साळे, अरविंद भोसले, महादेव साबळे, नानासाहेब नाईकनवरे, महादेव कांबळे, मल्हारी ढोबळे, किसन सातपुते, पूर्वा वाघमारे, येदा दुपारगुडे, दत्तात्रय खडतरे, कविता खडतरे.

इतर मागासवर्गीय : १ जागा (१९ व्यक्ती, १९ अर्ज)

सिद्धाराम म्हेत्रे, अजिंक्यराणा पाटील, भीमराज येडवे, नागनाथ कदम, जमीर सुतार, बसवराज पाटील, श्रीशैल बनशेट्टी, शोभा बनशेट्टी, सुरेश हसापुरे, श्रीदिप हसापुरे, पृथ्वीराज माने, जयकुमार माने, चिदानंद स्वामी, नागनाथ शिंदे, विशाल केवारे, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर आवताडे, लतिफ तांबोळी, शाम आकळे.

विमुक्त जाती/भटक्या जमाती : १ जागा (२३ व्यक्ती, २४ अर्ज)

हनमंत मासाळ, युवराज राठोड, पोपट गडदे, राहुल घुटुकडे, विलास लेंगरे, संजय राठोड, प्रताप टेकाळे, रुपाली लवटे, प्रथमेश पाटील, अनिकेत देशमुख, शिवाजी कांबळे, मारुती लवटे, राहुल वाघमोडे, बिरमल कोळी, राजेंद्र बंदीछोडे, श्रीधर कोंडले, तानाजी वाघमोडे, रमेश वाकसे, विलास पाटील, ज्ञानराज पाटील, महेंद्र खटके, प्रमोद राठोड, हनमंत सुळ.

पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया : १ जागा (१६ व्यक्ती, १९ अर्ज)

सुशील आवताडे, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे, बाबुराव गायकवाड, सूर्यादित्य साळुंखे, रमेश जाधव पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विजय ताटे, धैर्यशील मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह जहागिरदार, मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, यशवंत शिंदे, समाधान आवताडे, अभिजीत पाटील.

दुग्ध संस्था, वैयक्तिक भागधारक : १ जागा (१३ व्यक्ती, १५ अर्ज)

रणजित शिंदे, मल्हारी गायकवाड, सूर्यादित्य शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, मारुती लवटे, वनिता लवटे, पूजा चौगुले, शिवाजी पाटील, बाळासाहेब माळी, अभिजीत घाडगे, समाधान आवताडे.

Solapur Dcc Bank Election
Koyna Water Crisis : शंभूराज देसाईंविरोधात सांगलीचे नेते आक्रमक : ‘कोयने’चे पाणी अडवणारे तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? : जयंतराव, संजयकाका, पडळकर, पाटील, कदम एकटवले

नागरी बँका व पतसंस्था : १ जागा (३२ व्यक्ती, ३७ अर्ज)

सिद्धेश्र्वर आवताडे, अजिंक्याराणा पाटील, मनीष देशमुख, सुभाष देशमुख, प्रकाश पाटील, अस्मिता गायकवाड, कल्याण काळे, भीमाशंकर जमादार, सिद्धाराम चाकोते, रणजित शिंदे, अमोल शिंदे, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, राजेंद्र गंगदे, कन्हैयालाल देवी, श्रीशैल बनशेट्टी, शोभा बनशेट्टी, सोमराज गायकवाड, सूर्यादित्य साळुंखे, देवानंद गुंड, नीता गुंड, अरविंद काळेल, चंद्रशेखर कौंडुभैरी, सुभाष गुळवे, भारत जाधव, शंकर पाटील, बाळासाहेब काटकर, श्रीधर कोंडले, विशाल केवारे, प्रणव परिचारक, राजकुमार हंचाटे, समाधान आवताडे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Babanrao Autade-Rajan Patil-Rajendra Raut
Solapur Dcc Bank Election-Leader
Solapur Dcc Bank Election
Solapur Dcc Bank Election