Solapur Dcc Bank : भाजपने सोलापूर DCC बॅंकेत उघडले विजयाचे खाते ; राजन पाटील, राजेंद्र राऊत, बबनराव आवताडेंची बिनविरोध निवड निश्चित, या 3 नेत्यांनाही संधी

Rajan Patil, Rajendra Raut, Babanrao Autade unopposed election : सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 जागांसाठी 201 उमेदवारांनी 238 अर्ज दाखल केले. मोहोळमधून विक्रांत पाटील, मंगळवेढ्यातून आवताडे कुटुंबातील उमेदवार आणि बार्शीतून राजेंद्र राऊत यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.
Babanrao Autade-Rajan Patil-Rajendra Raut
Babanrao Autade-Rajan Patil-Rajendra RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 30 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या १९ जागांसाठी २०१ जणांनी २३८ अर्ज दाखल केले आहेत. त्यातील ३७ जणांनी दोन अर्ज भरले आहेत. सोसायटी मतदारसंघाच्या ११ पैकी ४ जागांचे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट झाले आहे. मोहोळमधून पाटील पिता-पुत्रांचे दोन अर्ज आल्याने विक्रांत (बाळराजे) पाटील यांची, मंगळवेढ्यातून बबनराव आवताडे आणि त्यांच्या दोन मुलांचे असे एकूण ६ अर्ज आल्याने येथून आवताडे, तर बार्शीतून राऊत पिता-पुत्रांचेच अर्ज आहेत, त्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांची या तिघांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

दरम्यान, पंढरपूर सोसायटी मतदारसंघातही एकूण ६ अर्ज आले असून त्यातील ५ अर्ज माजी आमदार प्रशांत परिचारक कुटुंबातील आहेत. त्यांच्याविरोधात कल्याणराव काळे यांचा अर्ज आहे. उत्तर सोलापूर सोसायटी मतदारसंघासाठी १० अर्ज आले असून ९ अर्ज हे माजी आमदार दिलीप माने यांच्या कुटुंबातील आहेत. दहावा अर्ज हा मार्डीचे बाबासाहेब पाटील यांचा आहे. करमाळ्यातूनही पाच अर्ज आले आहेत, त्यातील चार अर्ज हे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि त्यांचे चिरंजीवांचे आहेत. एकमेव अर्ज सुभाष गुळवे यांचा आहे.

सामोपचाराने वाटाघाटी झाल्यास या तीनही जागा बिनविरोध होऊ शकतात, त्यामुळे पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक, करमाळ्यातून जयवंतराव जगताप, तर उत्तर सोलापूरमधून दिलीप माने यांची बिनविरोध निवड होऊ शकते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून जिल्ह्यातील आजी-माजी आमदार मैदानात उतरले आहेत. सर्वाधिक प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून याकडे पाहिले जाते. मतदारसंघाच्या ११ जागांसाठी ७२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सोसायटी मतदारसंघातील ११ जागांपैकी ३ जागा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरेाध झाल्यात जमा आहेत. यात बार्शीमधून आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचे चिरंजीव रणवीर राऊत या दोघांचेच सहा अर्ज आहेत, त्यामुळे बार्शीतून राजेंद्र राऊत यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

Babanrao Autade-Rajan Patil-Rajendra Raut
Koyna Water Crisis : शंभूराज देसाईंविरोधात सांगलीचे नेते आक्रमक : ‘कोयने’चे पाणी अडवणारे तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? : जयंतराव, संजयकाका, पडळकर, पाटील, कदम एकटवले

मंगळवेढा मतदारसंघातून जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, त्यांचे चिरंजीव सुशील आणि सिद्धेश्वर आवताडे यांचे सहा अर्ज आहेत, त्यामुळे मंगळवेढ्यातून आवताडे बिनविरोध निवडून येणार हे निश्चित आहे. आता बबनराव आवताडे स्वतः बॅंकेत येतात की त्यांचे चिरंजीव याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Babanrao Autade-Rajan Patil-Rajendra Raut
Mohite Patil : मोहिते पाटलांचा कल्याणशेट्टींवर पलटवार : विधान परिषदेची त्यांनी अर्धीच गोष्ट सांगितली; सामंतांचा फोन...मुख्यमंत्र्यांचा निरोप; पण माझं सर्वांना एकच उत्तर...

मोहोळ सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील या दोघांचेच अर्ज आहेत. त्यामुळे राजन पाटील पुन्हा बॅंकेत येणार की बाळराजे पाटील यांना संधी देतात, याकडे मोहोळचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.