Solapur Dcc Bank : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी 2165 ठराव; परिचारकांच्या पंढरपुरात सहकाराचे सर्वाधिक 181 ठराव

Resolutions for Solapur DCC Bank Election 2026 : आठ वर्षांनंतर होत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 2165 ठराव दाखल झाले. भाजपच्या बँक ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब ठरावांत दिसत असून प्रारूप मतदारयादी लवकरच जाहीर होणार आहे.
Solapur Dcc Bank
Solapur Dcc BankSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 September : तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकूण २१६५ ठराव दाखल झाले आहेत. बॅंक ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून ठरावांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहेत. आता हे ठराव सहनिबंधकांकडे प्रारुप मतदारयादीसाठी पाठविण्यात येणार असून आक्षेप आणि हरकतीनंतर त्यांच्याकडून प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे.

ज्या मतदारसंघातून मंत्री, आमदार, खासदारांची जिल्हा बॅंकेत एन्ट्री होते, त्या सोसायटी गटातून एकूण १२४३ ठराव झाले आहेत. यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १८१ ठराव झाले आहेत. त्यानंतर माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या माढ्यात १७५, मोहिते पाटील यांच्या माळशिरसमध्ये १४१ ठराव झाले आहेत, त्यामुळे भाजपची वाटचाल सत्तेच्या दिशेने सुरू असल्याचे ठरावाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून १२४३, सहकारी दुग्ध संस्था गटातून २२०, नागरी बॅंका आणि पतसंस्था मतदारसंघातून ६१७, तर कृषी प्रक्रिया पणन मतदारसंघातू ८५ ठराव झाले आहेत. आता या ठरावांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पाठवली जाईल, त्याची यादी सहाय्यक सहनिबंधकांकडे पाठविण्यात येईल, त्यानंतर कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सुभाषबापू-शहाजी पवारांची एन्ट्री

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी यंदा बॅंका-पतसंस्था गटातून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा लोकमंगल सहकारी बॅंकेकडून ठराव करण्यात आहे, त्यामुळे आमदार देशमुख यांची पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एन्ट्री होत आहे. याशिवाय देशमुख यांचे एकेकाळचे कट्टर अनुयायी आणि भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शहाजी पवार यांचाही रुक्मिणी पसंस्थेकडून ठराव करण्यात आलेला आहे. तसेच, गेली दोन निवडणुकीत नागरी बॅंका आणि पतसंस्था गटातून निवडून आलेले माजी आमदार बबनराव शिंदे यांची भूमिका काय असणार, यावरही या मतदारसंघाच्या लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.

Solapur Dcc Bank
Solapur BJP Yuva Morcha : निष्ठावंतांसह नवख्यांचा समावेश असलेली भाजप युवा मोर्चाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर; अक्कलकोटचे वर्चस्व

मोहिते पाटलांच्या भूमिकेची उत्सुकता

सोलापूर जिल्ह्यात गेली वर्षभर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष झाला आहे. विशेषतः नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती, महापालिका आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना रंगला होता. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत किमान तीन जागांवर मोहिते पाटलांच्या वर्चस्व आहे, त्यामुळे पक्षविरहीत पॅनेल असणार की भाजपचा स्वतंत्र पॅनेल असणार, याची उत्सुकता आहे.

विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गटातील तालुकानिहाय ठराव

उत्तर सोलापूर : ६६

दक्षिण सोलापूर : ८२

मंगळवेढा : ६२

सांगोला : ७९

माळशिरस : १४१

पंढरपूर : १८१

मोहोळ : १२०

माढा : १७५

करमाळा : ११३

बार्शी : १३५

अक्कलकोट : ८९

एकूण ......... १२४३

Solapur Dcc Bank
Satara Dcc Bank : साताऱ्यात मोठ्या घडामोडी : रामराजेंच्या उपस्थितीत मातब्बर नेत्यांची जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत खलबतं

कृषी प्रक्रिया-पणन प्रक्रिया : ८५

दुग्ध सहकारी संस्था : २२०

नागरी बॅंका-पतसंस्था : ६१७

एकूण ......... २१६५

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com