शाखाधिकारी अन् सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने मारला व्याज, शासकीय अनुदानावर डल्ला; जिल्हा बँकेला 30 लाखांचा चूना

Sangli Dcc bank News : जिल्हा बँकेच्या गार्डी (ता. खानापूर) येथील शाखेत शासकीय अनुदान व व्याजावर शाखाधिकारी आणि एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.
fraud in Sangli Dcc bank
fraud in Sangli Dcc banksarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्हा बँकेच्या अनियमेततेवरून सध्या राजकारण तापलं आहे. याची सध्या चौकशी सुरू असून मंत्रालयात देखील सुनाणी सुरू आहे. अशातच बँकेच्या गार्डी (ता. खानापूर) येथील शाखेत मोठा घोटाळा समोर आला आहे. शासकीय अनुदान व व्याजामध्ये तब्बल 30 लाखांच्या रक्कमेवरच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शाखाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात शाखेतीलच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. सध्या या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Sangli District Bank branch manager suspended after ₹30 lakh embezzlement)

जिल्हा बँकेच्या गार्डी (ता. खानापूर जि. सांगली) येथील शाखेत शासकीय अनुदान व व्याजामध्ये तब्बल 30 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव यांना निलंबित करण्यात आले असून या अपहारात शाखेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या दोघांची सध्या चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल आल्यानंतर दोघांवरही फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी माहिती दिली आहे.

जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून जमा झालेल्या शासकीय अनुदानात घोटाळा झाल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उघड होत आहेत. गेल्या आठ-दहा वर्षांतील हे घोटाळे आहेत. शासन, बँकेचे अधिकारी संयुक्तपणे सर्व शाखांची तपासणी करत आहेत. त्यात हे घोटाळ्याचे प्रकार उघडकीस येत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व अन्य नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले मदत, अनुदान संबधित शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यावर जमा झालेले असते.

fraud in Sangli Dcc bank
Sangli Congress News : विधानसभेलाही 'सांगली पॅटर्न' कायम, विशाल पाटील सोबत असल्याने जयश्री पाटील बंडखोरीवर ठाम

काही शेतकऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे तसेच बँक खाते नसणे व अन्य कारणांमुळे ही मदत बँकेतच पडून राहते. अशा रकमांवर कर्मचाऱ्यांनी संगनमताने डल्ला मारल्याचे उघड होत आहे. अनेक ठिकाणी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देणे व्याज रकमेत घोटाळा केल्याचेही आता समोर आले आहे.

गार्डी शाखेत शासकीय अनुदान, व्याज रकमेत तब्बल 30 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. शाखाधिकारी रघुनाथ धोंडिराम यादव यांनी व या शाखेतील निवृत्त शाखाधिकारी धनराज रामचंद्र निकम यांनी संगनमताने घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. निकम दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. ते शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना यादव त्यावेळी लिपिक होते.

या प्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ यादव यांना सेवेतून निलंबित केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून याचा अहवाल आल्यानंतर दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

fraud in Sangli Dcc bank
Sangli Congress News : विधानसभेलाही 'सांगली पॅटर्न' कायम, विशाल पाटील सोबत असल्याने जयश्री पाटील बंडखोरीवर ठाम

घोटाळेबाज निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी गोठवल्या

गार्डी शाखेतील अपहारात शासकीय अनुदान रक्कम कमी असून, देणी व्याजाची रक्कम जास्त आहे. शाखाधिकारी रघुनाथ यादव यांना निलंबित केले आहे. सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम यांच्या बँकेतील सुमारे चाळीस लाखांच्या ठेवी गोठवल्या आहेत. दोघांकडूनही रक्कम वसूल केली जाईल. अंतिम चौकशीनंतर दोघांवर फौजदारी करू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com