Solapur Dcc Bank Election : सोलापूर जिल्हा बॅंकेसाठी आवताडे पिता-पुत्रांसह श्रीदीप हसापुरेंनी भरला अर्ज; पहिल्या दोन दिवसांत 329 अर्जांची विक्री

Nomination Form News : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत 329 उमेदवारी अर्ज विकले गेले. सुभाष देशमुख, राजन पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी अर्ज घेतले. बबनराव आवताडे आणि त्यांच्या मुलांसह इतरांनीही निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.
Solapur Dcc Bank Election
Solapur Dcc Bank Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 27 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. २६ ऑक्टोबर) उमेदवारी अर्जांची विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांतच ३२९ अर्जांची विक्री झाली आहे. यात पहिल्या दिवशी २१९, तर आज ११० अर्जांची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, माजी संचालक सुरेश हसापुरे, कल्याणराव काळे यांच्यासह इतरांनी अर्ज विकत घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी जिल्हा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी, तसेच माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या मुलानेही अर्ज भरला आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २६ ऑक्टोबर) पहिल्याच दिवशी तब्बल २१९ अर्जांची विक्री झाली होती. पहिल्याच दिवशी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, माजी संचालक सुरेश हसापुरे, कल्याणराव काळे यांच्यासह इतरांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले.

नगरसेवक जयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने, इंदुमती अलगोंडा पाटील, भारत जाधव, मनीष देशमुख, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे आणि शंभूराजे जगताप यांनीही अर्ज विकत घेतले आहेत. पहिल्या दिवशी विक्री झालेल्या अर्जांमध्ये मोहोळ, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील अर्जदारांचा समावेश आहे.

दरम्यान, आज चार उमेदवारांनी विविध मतदारसंघातून सात अर्ज भरले आहेत. यात जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे, सुशील आवताडे आणि बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदिप हसापुरे यांचा समावेश आहे.

शेतकरी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषक सेवा सोसायटी मतदारसंघातून मंगळवेढ्यातील सुशील बबनराव आवताडे, सिद्धेश्वर बबनराव आवताडे व बबनराव बाबुराव आवताडे यांनी अर्ज भरले आहेत. सुशील यांच्या अर्जासाठी शैलेश बबनराव आवताडे सूचक असून पुनम सुशील आवताडे अनुमोदक आहेत.

Solapur Dcc Bank Election
Nagpur Graduate Result : नागपूरमध्ये भाजपला धक्का : काँग्रेसचे अभिजीत वंजारी पहिल्या फेरीत 7 ते 8 हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे कोहळे दुसऱ्या, तर कराळे मास्तर तिसऱ्या क्रमांकावर...

सिद्धेश्वर यांच्या अर्जाला हिम्मत पाटील हे सूचक असून प्रणाली सिद्धेश्वर आवताडे अनुमोदक आहेत. बबनराच आवताडे यांच्या अर्जास दिलीप सावंत सूचक असून सविता पाटील ह्या अनुमोदक आहेत. तसेच श्रीदिप सुरेश हसापुरे यांनी दक्षिण सोलापूरमधून याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्जासाठी जयशंकर नारायणराव पाटील सूचक असून प्रदिप खुने अनुमोदक आहेत.

सुशील बबनराव आवताडे यांनी कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्था, खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाना, ऑईल मिल, सुतगिरण्या व शेती माल प्रक्रिया संस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्जास दिलीप सावंत सूचक आणि बबनराव आवताडे अनुमोदक आहेत.

Solapur Dcc Bank Election
Nagpur Graduates constituency : नागपूर पदवीधरमध्ये धक्कादायक प्रकार : मतदानासाठी जांभळ्याऐवजी काळ्या शाईचा वापर, आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मते ठरवली वैध

सिद्धेश्वर आवताडे यांनी नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकरांच्या पतसंस्था, कंझुमर्स, पाणीपुरवठा, औद्योगिक तसेच ज्यांचा समावेश इतर मतदारसंघात नाही, अशा संस्थांमधून (विणकर, मजूर आणि गृहनिर्माण संस्था वगळून) अर्ज भरला आहे. यांच्या अर्जास दिलीप सावंत सूचक आहेत, शैलेश आवताडे अनुमोदक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com