620 Acres Land Purchase : झाडाणी येथील बांधकामे विनापरवानाच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष...

Chandrakant Valvi झाडाणी येथील ६२० एकर जमीन गुजरातचे जीएसटी आयुक्‍त चंद्रकांत वळवी यांच्‍यासह कुटुंब सदस्‍य व इतर १३ जणांनी खरेदी केली होती.
Satara collector Office
Satara collector Officesarkarnama

Satara News : झाडाणी (ता. महाबळेश्‍‍वर) येथील बांधकाम आणि इतर तांत्रिक बाबींच्‍या अनुषंगाने झालेल्‍या तक्रारीची दखल घेत साताऱ्याचे जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्‍याचे आदेश वाईचे प्रांताधिकारी यांना दिले होते. यानुसार त्‍या कार्यालयाने केलेल्या पाहणीत त्‍याठिकाणी सुरू असणारे बांधकाम विनापरवाना, तसेच जमीन खरेदीवेळी कमाल जमीन धारणा मर्यादेचेही उल्‍लंघन केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. यानुसार तयार झालेला अहवाल जितेंद्र डुडी यांना प्राप्‍त झाला असून, त्‍यातील इतर बाबी, नोंदी समोर येणे अद्याप बाकी आहे.

झाडाणी येथील ६२० एकर जमीन गुजरातचे जीएसटी आयुक्‍त चंद्रकांत वळवी यांच्‍यासह कुटुंब सदस्‍य व इतर १३ जणांनी खरेदी केली होती. या जागेत बांधकामे सुरू असल्‍याचे व इतर सुविधा उभारण्‍यात येत असल्‍याची कागदपत्रे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मिळवली होती. या कागदपत्रांची पडताळणी केल्‍यानंतर जमीन खरेदी आणि बांधकाम बेकायदेशीर असल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले.

यानुसार श्री. मोरे यांनी त्‍याबाबतचे निवेदन जिल्‍हाधिकारी डुडी यांना देत चौकशी करण्‍याची मागणी केली होती. निवेदनानुसार कार्यवाही न झाल्‍यास ता. १० जूनपासून आंदोलन करण्‍याचा इशाराही त्‍यांनी या निवेदनात दिला होता. या निवेदनाची दखल घेत साताऱ्याचे जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाई, महाबळेश्‍‍वर तहसीलदार, तसेच वाई प्रांताधिकारी यांना चौकशी, पाहणी करत अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले होते.

Satara collector Office
620 Acres Land Purchase : गुजरातमधील अधिकाऱ्याने बळकावलं महाराष्ट्रातील गाव, साताऱ्यात घेतली 620 एकर जमीन?

यानुसार पाहणी, चौकशी करत त्‍यांनी अहवाल तयार केला आहे. अहवालात गुजरातचे जीएसटी आयुक्‍त चंद्रकांत वळवी, अनिल विनायक वसावे, पियुष अरुण बोंगीरवार यांच्‍याकडून झाडाणी, उचाट, दोडाणी येथे कमाल जमीन धारणा मर्यादेचे उल्‍लंघन झाल्‍याचे, तसेच त्‍या जागेत सुरू असणाऱ्या बांधकामासाठी परवानगी नसल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

या अहवालात इतर कोणते आक्षेप नोंदविण्‍यात आले आहेत. त्‍यावर जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात गुजरात कनेक्शन असल्याने यामध्ये राजकिय हस्तक्षेप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना जिल्हाधिकारी डुडी यांचा कस लागणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Satara collector Office
Satara Collector : जितेंद्र डुडी नवे जिल्हाधिकारी; जयवंशी यांची तडकाफडकी बदली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com