Pune Crime : पुण्यात 73 वर्षीय वृद्धाचे संतापजनक कृत्य! 'एक पप्पी... दे', म्हणत केला 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग

old man molesting woman : पुण्यात पन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता तर एका 73 वर्षीय वृद्धानेच तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
Pune Crime
Pune Crimesarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून एका 73 वर्षीय वृद्धानेच तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी त्या वृद्धाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे आता पुण्यात संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

याबाबत विश्रामबाग रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील एका खासगी क्लिनिकमध्ये ही घटना घडली. येथे 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 73 वर्षीय वृद्धाने 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. या वृद्धाने क्लिनिकच्या रिसेप्शनवर एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केले.

त्या वृद्धाने तिला 'मला एक पप्पी दे, तुला हवं ते देतो', असेही म्हणाल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. या या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या त्या वृद्धाचे नाव सुरेशचंद चोरडिया असे आहे.

Pune Crime
Pune Crime News : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; धक्का देत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप

नेमकं काय घडलं?

सुरेशचंद चोरडिया या वृद्धाने 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्या क्लिनिकमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ती तरूणी तेथे एकटीच रिसेप्शनवर होती. यावेळी चोरडिया याने संधी साधत तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. फक्त वर्तनच केले नाही. तर तिच्या गालाला हात लावत “पप्पी दे” माझ्याकडे पैसे आहेत. तुला जे हवे ते मी देतो. तुला हॉटेलमध्ये जेवायला नेतो, पण मला पप्पी दे, अशी मागणी केली.

या धक्कादायक आणि अनपेक्षित प्रकारानंतर घाबरलेल्या त्या तरुणीने तात्काळ क्लिनिकबाहेर पळ काढला, पण चोरडियाने पुन्हा पाठलाग करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत त्या तरूणीने हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली.

Pune Crime
Pune Crime News: पुण्यातील सदाशिव पेठेत मोठी दुर्घटना; मद्यधुंद कारचालकानं 13 जणांना उडवलं

तक्रारदार तरूणीच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरडियाला अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com