Pune Crime News : पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; धक्का देत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप

BJP Leader Molesting PSI : भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्का देऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
BJP leader accused of misbehaving with a woman police officer; protest intensifies.
BJP leader accused of misbehaving with a woman police officer; protest intensifies.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मागील काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत जात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना शहरातील एका भाजप पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याचे समोर आले आहे.

भाजप पुणे शहर महामंत्री प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्यानिमित्त शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या दरम्यान दुपारी १.३० वाजता पुण्यातील कसबा पोलीस चौकी परिसरात घडली. त्यावेळी काही भाजप पदाधिकारी स्थानिक चहाच्या टपरीवर थांबले त्याच ठिकाणी या महिला पोलिस अधिकारी ड्युटीवर होत्या.

प्रमोद कोंढरे हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला धक्का देऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

BJP leader accused of misbehaving with a woman police officer; protest intensifies.
Shivsena UBT-MNS : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा खासदार अन् राज ठाकरेंच्या शिलेदाराची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं कारण काय?

प्रमोद कोंढारेंनी आरोफ फेटाळले

दरम्यान, याबाबत प्रमोद कोंढरे यांनी या सर्व आरोपांना स्पष्ट शब्दांत नकार दिला असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले . त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्याकडून कोणताही हेतुपुरस्सर स्पर्श किंवा गैरवर्तन झालेले नाही.

फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार महिला अधिकाऱ्याचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचे जबाब नोंदवले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम ७४ (स्त्री विनयभंग) आणि ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

BJP leader accused of misbehaving with a woman police officer; protest intensifies.
Prasad Lad pen drive ED : ‘मिठी’चे धागेदोरे दुबईपासून लंडनपर्यंत; प्रसाद लाड यांचा 'पेन ड्राईव्ह बाॅम्ब'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com