Dudhganga Scam News : 'दूधगंगा'तील ठेवीदारांचे 80 कोटी लाटले ; चार जणांना अटक !

Ahmednagar Politics : देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याने, या पतसंस्थेला गेल्या वर्षी (2022) कुलूप लावण्यात आले होते.
Ahmednagar News :
Ahmednagar News :Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : संगमनेर येथील दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी, ७९ लाख, ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार गुन्ह्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्याने संगमनेर-राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar News :
BJP News : भाजपने पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले!

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून होत होती. ठेवीदारांना देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याने, या पतसंस्थेला गेल्या वर्षी (2022) कुलूप लावण्यात आले होते. यानंतर पतसंस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेचे व्यवस्थापक आणि काही कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.

जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेच्या २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेरलेखापरीक्षण करण्याची सूचना केली होती. यानंतर जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी या पतसंस्थेचे फेर लेखापरीक्षण केले. या तपासणीत आलेल्या माहिती नुसार जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar News :
Shivsena News : एकनाथ शिंदे नव्हे गुजरातची लॉबी चालविते राज्यातील सरकार

दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह नातेवाइकांनी ८० कोटी, ७९ लाख, ४१ हजार ९८१९ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब दामोदर कुटे (रा. गणपती मळा सुकेवाडी), भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर), भाऊसाहेब संतु गायकवाड (मृत) (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन नागराज बाबा कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर) इत्यादी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com