Bhagwan Rampure : शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम 24 वर्षांच्या मुलाला दिलं होतं; सोलापूरच्या शिल्पकाराचा गौप्यस्फोट

Chhatrapati shivaji Maharaj's statue : मागच्या पाच ते सहा वर्षांत मोठ्या पुतळ्यांचा ट्रेंड आला आहे, त्यामुळे याबाबत त्या मुलाचा अभ्यास किती आहे? असा सवाल शिल्पकार रामपुरे यांनी केला.
Bhagwan Rampure
Bhagwan RampureSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 August : मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट उंचीचा पुतळा सोमवारी कोसळला, त्या प्रकरणी सोलापूरमधील प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम 24 वर्षांच्या मुलाला देण्यात आलं होतं, त्यामुळे त्याला अनुभव किती असेल..? असा सवाल करून पुतळ्याच्या मजबुतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati shivaji Maharaj's statue) कोसळणे, ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. पुतळा कोणत्या शिल्पकाराने केला, हे महत्वाचं नाही. छत्रपतींचा पुतळा कोसळण्याला केवळ शिल्पकारच नाही तर अनेक जण जबाबदार आहेत.

टेंडर काढतेवेळी नियम असा आहे की, जो सर्वात कमी कोटेशन देईल, त्यालाच टेंडर दिले जाते. त्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत आणि योग्य भाव लावतात, त्यांना ते काम मिळत नाही आणि नको त्या माणसाला कामं मिळतं. यामध्ये सिस्टीमचे काही सोर्सेस आहेत. वशीलेबाजीने मर्जीतील माणसाला काम दिले जाते, अशा शब्दांत भगवान रामपुरे (Bhagwan Rampure) यांनी प्रशासकीय कामकाजावरच बोट ठेवले.

रामपुरे म्हणाले, टेंडरचा 2003 मधील स्वानुभव फार मोठा आहे, मागच्या 40 वर्षांचा अनुभव पाठीशी असल्याने मागच्या 20 वर्षांपासून मी टेंडर पद्धतीने काम करणे बंद केले आहे. सोलापूर महापालिकेच्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याचे शेवटचं काम टेंडर पद्धतीने केलं आणि त्यातून जो अनुभव आला तेंव्हापासून टेंडर पद्धतीने काम करणे बंद केलं.

Bhagwan Rampure
Vitthal Sugar Factory : विधानसभेच्या तोंडावर अभिजीत पाटलांना ‘बूस्टर डोस’; 'विठ्ठल'ला 267 कोटींचे अर्थसाहाय्य

जेव्हा पुतळा 15 फुटांपेक्षा जास्त उंचीचा असतो, तेव्हा ते फक्त शिल्पकाराचे काम न राहता अभियंत्यांचही काम असतं. जेवढी पुतळ्याची उंची असते, तेवढाच त्याचा पाया भक्कम असणेही महत्वाचे असते. भक्कम पाया करण्यासाठी जमिनीचा सर्वे करणे गरजेचे असते. मुरूम, माती, पाणी, खडक याचा विचार प्रामुख्याने केला जातो. काळा खडक असेल तर त्याला उत्तम समजले जाते, असेही रामपुरे यांनी सांगितले.

रामपुरे म्हणाले, जमीन पाहूनच मोठ्या पुतळ्यासाठी जागा निवडली जाते. भूकंप झाला तरी पुतळ्यांना तडा जाऊ नये, अशा पद्धतीची जागा निवडली जाते. यामध्ये साधारण 500 वर्षांची गॅरंटी असल्याशिवाय एवढे मोठे पुतळे उभारले जातं नाहीत. कोट्यवधी रुपयांचा खर्च पुतळा उभारण्यासाठी होत असल्याने त्याची मजबुतीही तेवढीच महत्वाची असते.

Bhagwan Rampure
Solapur NCP : महेश कोठे राष्ट्रवादीत नाराज?; पक्षाच्या कार्यक्रमांमधून गायब, असहकार्याची भावना

छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम 24 वर्षांच्या मुलाला देण्यात आलं होतं, त्यामुळे त्याला अनुभव किती असेल..? मागच्या पाच ते सहा वर्षांत मोठ्या पुतळ्यांचा ट्रेंड आला आहे, त्यामुळे याबाबत त्या मुलाचा अभ्यास किती आहे? असा सवाल करत रामपुरे म्हणाले, मी त्या शिल्पकाराची बातमी वाचली. उद्‌घाटनाची तारीख ठरल्याने वेळ कमी मिळाला, त्यामुळे त्याने शिल्प उभे न करता रातोरात 3D मधून प्रिंट काढली. जर 3D ने शिल्पकार होणार असाल, तर कॉलेजमध्ये शिकायला जाऊन शिल्पकार होण्याची गरज नाही, असेही परखड मत ही रामपुरे यांनी नोंदविले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com