

Sangli News : झटपट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सुजाता नंदकुमार इंगळे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे दुप्पट करुन देतो असं सांगून सांगलीतील सह्याद्री ट्रेडिंग, डेव्हलपमेंट कंपनीने पैसे घेतले मात्र ते पैसे परत दिले नाहीत, यामुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. इंगळे या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.नइंगळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी 55 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पण दुसरीकडे आपणही गुंतवणूकदार असल्याचं इंगळे यांनी भासवले.
सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामदुप्पट करून देतो असं सांगत, सांगलीतील काँग्रेस भवनाजवळ सह्याद्री ट्रेडिंग आणि डेव्हलपमेंट या कंपनीचे कार्यालय होते. ठाकरे यांच्या गटाच्या सुजाता इंगळेही या कंपनीशी संबंधित आहेत. या कंपनीने गुंतवणूक केलेल्या काही जणांना काही परतावे दिले. पण नंतर परतावे मिळणे बंद झाले. काहीच न मिळाल्याने आता गुंतवणूकदारांकडून तक्रारी समोर येऊ आल्या. सुनंदा मोरे यांनीही या प्रकरणी तक्रारी दिली होती.
अधिक तपास सांगली पोलीस करत आहेत. याबाबत आपणही गुंतवणूकदार आहोत त्याबाबतचे पुरावे, पोलिसांना दिल्याचे इंगळे यांनी म्हटलं आहे. सांगलीत गेल्या 2 वर्षांपासून शेअर मार्केट आणि इतर गुंतवणुकीच्या अनेक प्रकारात फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. ज्या कंपन्याकडून फसवणूक झाली त्यां कंपन्यांमध्ये काही राजकीय लोकांचे संबंधही असल्याचीही माहिती मिळाली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.