Vishal Patil
Vishal PatilSarkarnama

Vishal Patil : सांगलीतील उमेदवार विशाल पाटलांची बदनामी, दोघांविरोधात गुन्हा नोंद

Criem News : इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, न्यूज पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व त्यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Published on

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला. जागा वाटपावरून झालेल्या महाविकास आघाडीतील मतभेदामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी राहिले. अशातच मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे Congress नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची बदनामी करणारे संदेश व्हाट्सअपवर व्हायरल झाले. त्यावर आक्षेप घेतलेल्या विशाल पाटील यांच्या समर्थकांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.

Vishal Patil
Pune Lok Sabha News : धक्कादायक! काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावे बोगस मतदान; तक्रारींचा पाऊस...

याप्रकरणी संशयित तानाजी जाधव, शुभम शिंदे या दोघांविरूद्ध फिर्याद सांगली पोलिसात तक्रार दिली होती. या दोघा संशयतांनी इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, न्यूज़ पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील व कुटुंबाची सोशल मीडियावर Social Media बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटांकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आणि काँग्रेसचे बंडखोरी अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सात मे रोजी मतदान पार पडले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सहा मे रोजी खासदार संजयकाका जनसंपर्क नामक व्हाॅट्सअप ग्रुपवर 'मदनभाऊ गट विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त.

विशाल पाटील यांची सीट धोक्यात.' असा मजकुर असणारा व्हिडीओ आणि काही लिंक्स व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल केल्या. शिवाय इतर आक्षेपाह व्हिडीओ प्रसारित केले. या संपूर्ण प्रकरणावर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. दोघा संशयाविरोधात तक्रार दिली. उमेदवाराची प्रतिमा मलिन करून मतदानावर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. विशाल पाटील Vishal Patil यांचे प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.

Vishal Patil
Loksabha Election 2024 : मतदार यादीतील घोळामुळे पुणेकर नाराज; मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com