Loksabha Election 2024 : मतदार यादीतील घोळामुळे पुणेकर नाराज; मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला संताप

Narendra Modi पुण्यात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक बाहेर पडले असल्याचा विश्वास यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे लोकसभेसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झाल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा आकडा कुठेतरी घटलेला पाहायला मिळाला. त्यामुळे पुण्यात देखील अशीच परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र शहरामध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर ती लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी 11 पर्यंत पुण्यामध्ये 16.16 इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान हे कोथरूड परिसरात झाले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास आणि मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रावरती मतदार यादीतल्या घोळामुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला मोहोळ म्हणाले, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने ते पार पाडले पाहिजे. मी माझ्या कुटुंबाचं असे कर्तव्य पार पडल आहे. निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक आयोगाने याकडे कधीतरी लक्ष देऊन याद्या अपडेट करणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे.

Murlidhar Mohol
Pune Lok Sabha Election Voting : हु इज धंगेकर? नंतर चंद्रकांतदादांचा आणखी एक इंग्लिश डायलॉग

आम्ही राजकीय पक्ष म्हणून मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी मदत करत असतो. मात्र निवडणूक आयोगाचे कर्तव्य असल्याने कधीतरी ते गांभीर्याने घेऊन याद्या दुरुस्त कराव्या. निवडणुका आल्या की सर्वेक्षण आणि याद्या अपडेट करण्याचे काम करण्यात येतं. मात्र हे काम बाराही महिने करणे आवश्यक आहे. जेणेकरून पुढील काही निवडणुकांमध्ये मतदार यादी मधला घोळ कमी होण्यास मदत होईल.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

मतदार केंद्रावरती लांबच लांब रांगा लाग कुठेतरी प्रशासनाकडून नियोजनामध्ये कमी जाणवत आहे. मतदान केंद्रावर नेमलेल्या अधिकाऱ्यांना देखील पूर्णपणे प्रशिक्षण दिलय का? असा प्रश्न पडत असल्याचं मोहळ यांनी सांगितलं. पुण्यात मोठ्याप्रमाणात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी नागरिक बाहेर पडले असल्याचा विश्वास यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Bambare

Murlidhar Mohol
Pune Loksabha Election Update: मनसेच्या किशोर शिंदेंचा पारा चढला, होमगार्डला दाखवला इंगा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com