Karad News : शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बॅंक मॅनेजरवर गुन्हा दाखल होणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai मंत्री देसाई आज कऱ्हाड येथे दौऱ्यावर असताना आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama

Karad News : राष्ट्रीयकृत बॅंका कृषी पत पुरवठ्याचा कोटा पुर्ण करत नाहीत अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. ज्या बॅंका कृषी पतपुरवठा करणार नाहीत, त्या बॅंकांच्या मॅनेजरवर सरकार फौजदारी गुन्हा दाखल करेल, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री आणि साताराचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. उद्योग, सबसीडी, महामंडळाच्या योजनांबाबत काही तक्रारी असतील तर त्या माझ्याकडे द्या, पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही आवाहन त्यांनी केले.

मंत्री देसाई Shambhuraj Desai आज कऱ्हाड येथे दौऱ्यावर असताना आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रीयकृत बॅंका कृषी पत पुरवठ्याचा कोटा पुर्ण करत नाहीत अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कृषी पतपुरवठा ज्या बॅंका करणार नाहीत त्या बॅंकांच्या मॅनेजवर सरकार फौजदारी गुन्हा दाखल करेल. उद्योग, सबसीडी, महामंडळाच्या योजनांच्याबाबत माझ्याकडे तक्रारी द्याव्या.

पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात येईल. कृषी सन्मान योजनेत कृषी विभाग आणि महसुल विभागाचा समन्वय नसेल आणि शेतकऱ्यांची गैरसोय होत असेल तर तातडीने मी कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तांत्रीक अडचण दूर करेन. ते म्हणाले, नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देवु अशी घोषणा उद्धव ठाकरे Udhav Thackeray मुख्यमंत्री आणि अजित पवार Ajit Pawar उपमुख्यमंत्री असताना विधानसभेत केली होती.

Shambhuraj Desai
Shivsena News : आमची बाजु भक्कम; विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहुनच आमची कृती...शंभूराज देसाई

मात्र, त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांना ते देता आले नाहीत. आमचे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर केवळ चार-पाच महिन्यातच आम्ही एका क्लीकवर साडेसात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. जो शेतकरी नियमीत कर्ज फेडण्यात पात्र आहेत त्यातुन एकही शेतकरी त्यापासून वंचीत राहणार नाहीत. उर्वरीत शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे देण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे.

Shambhuraj Desai
Satara Congress News : कर्नाटक निवडणुकीत भाजपला बजरंग बलीही वाचवणार नाही : नाना पटोले

ते म्हणाले, उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदेशीर दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकाला अलर्ट केले आहे. भरारी पथकाला स्वतंत्र वाहने दिली आहेत. यावर्षी 144 अधिकारी मिळाले आहेत, अजुन 140 अधिकारी मिळणार आहेत. एक हजार जवानांची जाहीरात काढली आहे. 1200 ते 1300 अधिकारी, कर्मचारी भरत आहे. खात्याची पदे दुप्पट करुन त्यावर नियंत्रण आणणार आहे. त्यामुळे कारवाया वाढल्या आहेत.

Shambhuraj Desai
Patan APMC News : पाटणमध्ये देसाई, पाटणकर गटात लढत; पालकमंत्र्यांची प्रतिष्ठापणाला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com