Digital Scam Kolhapur : NCP च्या महिला जिल्हाध्यक्षांच्या फेक अकाउंटवरून तरुणीला मेसेज; आरोपी गजाआड, काय आहे प्रकरण?

Digital Scam Alert Kolhapur : राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षाच्या नावे फेक अकाऊंट; तरुणीशी गैरकृत्य करणारा आरोपी गजाआड काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
Digital Scame Alert
Digital Scame AlertSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांच्या नावे बनावट अकाउंट काढून तरुणींशी गैर कृत्य करणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. समाज माध्यमांवर तरुणींना अश्लील मेसेज करण्याचा प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले होते.

एका तरुणीने सजगता दाखवत थेट कोल्हापूर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांना फोन केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यात राजकीय व्यक्तींच्या नावे बनावट अकाऊंट काढून तरुणींना मेसेज करणारा पहिलाच प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Digital Scame Alert
Shiv Sena In Thane: बालेकिल्ल्याचे तीन ‘प्रधान’...सतीश, आनंद अन् आता एकनाथ!

कोल्हापूर (Kolhapur News ) जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांच्या नावे कागल तालुक्यातील करनूर येथील तोहीद शेख याने इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट काढले होते. त्या माध्यमातून तरुणींशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास 700 पेक्षा जास्त फॉलोवर्स करून चॅटिंगच्या माध्यमातून मुलींची संपर्क साधण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

एका तरुणीने थेट शितल फरकटे यांना कॉल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र या सर्व प्रकाराबाबत काहीच कल्पना नसलेल्या शितल फराकटे काही काळ गोंधळल्या. मुलीकडून वस्तुस्थिती समजावून घेत परिस्थितीची माहिती घेतली.

Digital Scame Alert
Bharatpol : फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘भारतपोल’; अमित शहांचा मास्टरस्ट्रोक

त्यानंतर शितल फराकटे यांनी या प्रकरणाची माहिती घेत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी पोलिसांनी तोहीद शेकला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ होता. मात्र याची कोण कोण लागताच शेख याने स्वतःचा व्हिडिओ वायरल करत या प्रकरणावर आपण माफी मागणार असल्याचे विनंती केली. मात्र सायंकाळी पोलिसांनी रोहित शेख या तरुणाला ताब्यात घेत अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com