तानाजी सावंतांचा २४ तासांत ठाकरेंना झटका; सोलापूर शिवसेनेचा मोठा गट शिंदेंच्या गोटात!

माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, अमोल शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, हरीभाऊ चौगुले, सभापती तुकाराम मस्के, चरण चौरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, महावीर देशमुख आदी उपस्थित होते.
Eknath Shinde, Tanaji Sawant
Eknath Shinde, Tanaji SawantSarkarnama

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंतांची (Tanaji Sawant) हकालपट्टी केली. त्याला चोवीस तास होण्याआधीच सावंतांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, इतर चार-पाच माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांना फोडून शिंदे गटात सामील करून घेतले आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे स्वागत केले आहे. (A large group of Shiv Sena from Solapur joined Eknath Shinde's group)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट झाला आहे. शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याने शिवसेना नेमकी कोणाची, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची सात रस्ता येथील विश्रामगृहात बैठक पार पडली.

Eknath Shinde, Tanaji Sawant
अनिल परबांनी माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला बळ दिलं : बंडखोर योगेश कदमांचा घाणाघात

त्याचवेळी माजी मंत्री, तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी जबरदस्त राजकीय खेळी करत सोलापूर महापालिकेतील काही माजी पदाधिकारी, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट घडवून त्यांना पाठिंबा जाहीर करायला लावला. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेत नगरसविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, असे त्यातील काहींनी सांगितले. पण, आगामी काळात पक्षांतर्गत राजकारणामुळे ते पदाधिकारी निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसतील, अशीही चर्चा आहे.

Eknath Shinde, Tanaji Sawant
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

महेश कोठेंची उपस्थिती लक्षणीय

माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, अमोल शिंदे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, माजी शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के, माजी तालुकाप्रमुख चरण चौरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, पंढरपूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचेही बोलले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही कोठे राष्ट्रवादी प्रवेशावर ठाम

काँग्रेसमधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून आता राष्ट्रवादीत जाण्यास इच्छूक असणारे माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी त्यांच्या काही समर्थक नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर येथे भेट घेतली. त्यावेळी काहींनी उघडपणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. पण, महेश कोठे यांनी आपण सध्यातरी राष्ट्रवादी प्रवेशावर ठाम असल्याचे सांगितले. मात्र, पुढे भविष्यात राजकीय परिस्थिती पाहून काहीही होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com