Satara : सत्ताधाऱ्यांकडून लोकांना संभ्रमित करण्याचा डाव... बाळासाहेब पाटील

बदलत्या काळाची गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचा डिजिटल Digital Face चेहरा अधिक प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
NCP MLA Balasaheb Patil
NCP MLA Balasaheb Patilsarkarnama
Published on
Updated on

सातारा : देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न, आव्हाने असताना व्हॉटसअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर नेमके वास्तव काय आहे, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन : वेध भविष्याचा या अभ्यास शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या चार व पाच नोव्हेंबरला शिर्डीत होत आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजीमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन : वेध भविष्याचा या अभ्यास शिबिराची माहिती देण्यासाठी बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मंथन वेध भविष्याचा या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार , तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते, विचारवंत, अभ्यासक या शिबिरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षाने सभासद नोंदणी मोहीम राबवली असून ती गतीमान करुन ग्रामीण, शहरी भागात कार्यकर्त्यांच जाळे मजबूत करण्यात येत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना मिळणार आहे. देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हॉटसअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करुन लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहेत.

NCP MLA Balasaheb Patil
Currency : भारतीय नोटांवर पंतप्रधान मोदींचाही फोटो असावा : भाजप आमदाराची मागणी!

या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल, या संदर्भात मंथन शिबिरात मार्गदर्शन होणार आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाचा डिजिटल चेहरा अधिक प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. जिल्ह्यातून या शिबिरास प्रमुख पदाधिकारीव कार्यकर्ते जाणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणूकांत जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

NCP MLA Balasaheb Patil
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com