Kolhapur Crime News : पोलिस नवऱ्याची सुरा घेऊन दहशत बायकोला पडली महागात

Police Suspended News : करवीर तालुक्यातील पाचगाव येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता.
Ashutosh Shinde News
Ashutosh Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : घरगुती दोन कुटुंबातील वादावरून पोलिस असलेल्या नवऱ्याने हातात सुरा घेऊन गल्लीत घातलेला गोंधळ एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला चांगलाच महागात पडला आहे. करवीर तालुक्यातील पाचगाव येथे दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. शेजारी असलेल्या तरुणाला आणि त्याच्या आईला हातात सुरा घेऊन धमकावण्याचा प्रकार घडला होता. जिल्हा पोलिस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन पती-पत्नीचे निलंबन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संबंधित प्रकार हा करवीर तालुक्यातील पाचगावमधील शांतीनगर गाडगीळ कॉलनीत दोन दिवसांपूर्वी घडला होता. गल्लीतील दोन कुटुंबांमध्ये तीन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. विनोद कुमार वावरे आणि आशुतोष शिंदे यांच्यामध्ये वाद झाला होता. कुटुंबात हा वाद पुन्हा बुधवारी सुरू झाला होता. रात्री 8:45 च्या सुमारास दोघेही एकमेकांच्या घरासमोर उभे असताना झालेल्या वादातून पोलिस असलेल्या आशुतोष शिंदे यांनी थेट सुरा आणून गल्लीत दहशत माजवली होती.

Ashutosh Shinde News
IAS Rajesh Deshmukh : पुण्याचे कलेक्टर राजेश देशमुखांना जुने फर्निचर विकायचे आहे ?

व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या सोशल मीडियावर (Social Media) संबंधित पोलिस हातात सुरा घेऊन गल्लीत दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कौटुंबिक वाद झाल्यानंतर विनोद कुमार वावरे यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आशुतोष शिंदे, रेश्मा शिंदे, आणि स्वप्निल शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

वावरे हे दारात उभारले आहेत, शिंदे यांनी येऊन माझ्या बायकोकडे का बघतोस ? म्हणून मारहाण करून गेटवर लाथा बुक्क्या मारल्या आहेत. अशी तक्रार पोलिसात (Police) दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पोलिस दाम्पत्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Ashutosh Shinde News
Gadkari On Bawankule : गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे आता तुमची फजिती होणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com