सातारा : काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झाले. याच मुळे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक प्राध्यापक यांच्या आंदोलनास भेट दिली. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील कारभारावर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची घटना तयार करत असताना संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असे लिहिले होते.
मात्र, काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं आणि याच मुळे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून केला.
रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राज घराण्याचा मोठा वाटा आहे. मात्र, आता रयतच्या संचालक मंडळाच्या बाॅडीत योगदान नसणा-यांना सुद्धा घेतलं गेलंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.