Satara Congress News : राहुल गांधींच्या स्वागताची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांवर, साताऱ्यातून एक हजार कार्यकर्ते जाणार

Rahul Gandhi राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीचे निमंत्रण देण्यात येणार आहे.
Prithviraj Chavan, Rahul  Gandhi
Prithviraj Chavan, Rahul Gandhisarkarnama

Satara Congress News : इंडिया आघाडीच्या ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबरला मुंबई येथे होणाऱ्या बैठकीला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.

केंद्रातील जुलमी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबरला होत आहे. या बैठकीचे प्रमुख आकर्षण युवकांचे आयडॉल व खासदार राहुल गांधी Rahul Gandhi असून त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र काँग्रेस Congress सज्ज झाली आहे.

त्यांच्या स्वागतासाठी राज्यातून लाखो कार्यकर्ते येणार असून यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

यावेळी राहुल गांधी यांना सातारा जिल्ह्यातील प्रतापगड भेटीचे निमंत्रण दिले जाणार असून प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आग्रह करण्यात येणार आहे.

Prithviraj Chavan, Rahul  Gandhi
Rahul Gandhi For PM : 'इंडिया'चा पहिला बॅट्समॅन ठरला; राहुल गांधी असणार पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात, बाबासाहेब माने, संदीप चव्हाण, अभिजित पाटील, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्तात्रय धनावडे, संदीप माने, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com